मुंबई : बाहुबली या चित्रपटाने यंदाच्या वर्षी बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशा - परदेशामध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच गेल्या वर्षभरापासून 'कटप्पा'ने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचे गूढ उकलले. 
 
 दोन भागांमध्ये सुमारे २ वर्षांहून अधिक काळ 'बाहुबली'  या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाचे मूळ आकर्षणच ' कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्नाभोवती  होते.  


 कसं जपलं गुपित ?  


 बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांनी अखेर या प्रश्नामागचं गुपित उलगडले आहे.  ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्विस सावनचा शो 'टेक 2 विथअनुपमा एंड राजीव' या कार्यक्रमामध्ये राजमौली यांनी याबाबातचा खुलासा केला. 
 
 
  कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे रहस्य जपणं किती कठीण होतं ? याबद्दल विचारणा  केल्यानंतर  राजमौली म्हणाले , ' चित्रपट तुम्ही दोनदा नीट बघितला असता तर तुम्हांला याचा अंदाज लावू शकता येतो. अनेकांनी त्याबाबत ट्विटरवर योग्य   तर्क लावला होता. 
  
  बाहुबलीला का मारला ? यापेक्षा कसं मारलं हा प्रश्न कठीण होता. त्याचा अंदाज लावणं कठीण होतं.  



    टीममध्ये तुरळक लोकांना कथा माहित होती  



  
  बाहुबलीच्या दुसर्‍या भागामध्ये  कटप्पाने बाहुबलीला का मारले?  याबाबतचे रहस्य उलागडणार होते. मात्र टीमामध्येही १०-१५ लोकांना पूर्ण कथा ठाऊक होती.  
  
  चित्रपटाचे शूटिंग हे सलग भागामध्ये केले जात नसे. त्यामुळे अनेकदा टीममधील लोकांनादेखील अंदाज लावणं शक्य नव्हतं. त्यांचाही गोंधळ होत होता.