मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते कमल हसन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. त्यांनी त्यांच्या ६५व्या वर्षात पदार्पण केले आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कमल हसन यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंद्र यांच्यामुळे कमल हसन यांच्या आयुष्यला कलाटणी मिळाली. त्यांनी कमल यांना एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. तर दुसरीकडे अभिनेते रजनीकांत त्यावेळेस आपल्या करिअरसाठी स्ट्रगल करत होते. 


अशा कठीण प्रसंगी कमल हसन यांनी त्यांच्या मदतीसाठी एक हात पुढे केला. कमल हसन यांच्या चित्रपटांमध्ये रजनीकांत यांना सहायक अभिनेता म्हणून काम मिळालं. त्यांनंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आपल्या अभिनयाचा प्रवास कायम ठेवला. 


१९७९ साली आलेल्या 'निनैथाले इन्निकुम' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोन अभिनेते एकत्र झळकले होते. या चित्रपटानंतर रजनीकांत यांना अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  


कमल हसन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक कलाकृती चाहत्यांच्या मनावर विशेष राज्य करुन गेल्या. भारतीय कलाविश्वात बऱ्याच नवोदित कलाकारांसाठी हसन आदर्शस्थानी. त्यांच्या याच कलाकृतींमध्ये काहींचा उल्लेख करायचा झाल्यास 'पुष्पक', 'एक दुजे के लिए', 'सदमा', 'इंडियन' आणि 'चाची ४२०' अशा चित्रपटांची नावं समोर येतात.