Rajpal Yadav Video : 'भूल भुलैया 3' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटातील छोटे पंडितची भूमिका साकारणाऱ्या राजपाल यादवने माफी मागितली आहे. दिवाळीच्या दिवशी त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राजपाल यादव हात जोडून लोकांची माफी मागताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजपाल यादवने व्हिडीओमध्ये 'फटाके न वाजवण्याचा सल्ला देत आहे. कारण फटाक्यांमुळे प्रदूषण होते. त्यासोबतच प्राणी देखील घाबरतात. त्यामुळे सर्वांनी दिवाळी शांततेत साजरी करावी असं आवाहन राजपाल यादव याने केलं होतं. परंतु लोकांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. 


राजपाल यादवचा व्हिडीओ ट्रोल


लोकांनी राजपाल यादवच्या जुन्या व्हिडीओवर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये राजपाल यादव हा मांसाहारी बिर्याणी खाताना दिसत होता. त्यावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ट्रोल केल्यानंतर राजपाल यादवने त्याचा पूर्वीचा व्हिडीओ डिलेट केला आहे. त्यानंतर त्याने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लोकांची माफी मागताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ज्यामध्ये राजपाल यादव हा जोडून म्हणत आहे की, मित्रांनो, दिवाळीच्या शुभेच्छा. दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. जो मी लगेच डिलेट केला. या व्हिडीओमुळे देशातील आणि जगभरातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी त्यांची मनापासून माफी मागतो. सर्वांनी दिवाळी खूप छान साजरी करा. चांगले राहा. निरोगी राहा. मस्त राहा.


दिवाळीच्या शुभेच्छा


राजपाल यादवने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, मी मनापासून माफी मागतो. दिवाळीचा आनंद कमी करण्याचा माझा हेतू नव्हता. दिवाळी हा आपल्यासाठी आनंदाचा सण आहे. तो सर्वांनी खूप छान पद्धतीने साजरा करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम.