Rajpal Yadav : लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादव हा त्याच्या कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगसाठी ओळखला जातो. आजवर त्यानं अनेकांना त्याच्या कॉमेडीनं हसवलं आहे. खऱ्या आयुष्यात राजपाल यादवनं खूप दुख: सहन केलं आहे. राजपाल यादवच्या वयाच्या 20 वर्षी त्याच्या पत्नीनं बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच तिचे निधन झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी राजपाल यादवनं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजपाल यादवनं द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. हे सगळं वयात झालं जेव्हा या सगळ्या गोष्टी सांभाळणं त्याच्यासाठी खूप कठीण असतं. राजपालनं सांगितलं की त्याला खूप कमी वयात मिलिट्री क्लोदिंग फॅक्ट्रीत नोकरी मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण गावात एकच चर्चा होती की इतक्या कमी वयात नोकरी मिळवण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर करुणा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. याविषयी पुढे सांगत राजपाल म्हणाला, "त्याकाळात तुम्ही जर नोकरी करत असाल, तर कुटुंबातील लोक लगेच तुम्हाला लग्न करण्यास सांगायचे. माझ्या वडिलांनी माझं लग्न केल. माझ्या पहिल्या पत्नीचा आमच्या पहिल्या बाळाला (मुलीला) जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. मी तिला दुसऱ्याच दिवशी भेटणार होतो, पण तिचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जात होतो."



राजपाल यादव पुढे म्हणाला की 1991 मध्ये त्याच्या निधनानंतर त्याला एका अभिनेत्याच्या रुपात स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला 13 वर्षे लागले. त्या दरम्यान, त्यानं एनएसडीत शिक्षण घेतले, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. 200 मध्ये जेव्हा त्याचा जंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याला आता कलाकार म्हणून लोक ओळखतात. पुढे दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना राजपाल यादव म्हणाला, "मी 31 वर्षांचा होतो आणि तेव्हाच माझी ओळख राधाशी झाली. आमची भेट ही 2001 साली द हीरोची शूटिंग करत असताना झाली. मग आम्ही बोलू लागलो. दोघांच्या कुटुंबानं होकार दिल्यानंतर आम्ही 2003 साली लग्नबंधनात अडकलो."



हेही वाचा : बहिणीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहून भावानेही सोडला जीव; अभिनेत्याच्या घरावर शोककळा


पुढे पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीविषयी बोलताना राजपाल म्हणाला, "मी माझ्या पत्नीला कधीच साडी नेसायला किंवा काहीही करायला सांगितलं नाही. जसं मी माझ्या आईशी बोलतो, तसंच मी माझ्या पत्नीशी बोलतो. त्यासाठी तिनं भाषा शिकली. एकदिवस जेव्हा मी गावी गेलं तर पाहिलं तिनं तिचा चेहरा पधरानं झाकला होता. कारण गावात महिला वेगळ्या पद्धतीत राहतात. जेव्हा पण ती होळी किंवा दिवाळीला येते तेव्हा तिला पाहून कोणाला वाटणार नाही की तिला पाच भाषा येतात. मी कधीच इतके प्रयत्न केले नाही. माझे शिक्षक, माझी आई-वडील यांच्यानंतर जर कोणी मला सगळ्यात जास्त पाठिंबा दिला असेल तर 100 टक्के माझी पत्नी आहे. राधानं माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलीला स्वत: च्या मुलीसारखं सांभाळलं. ती आता लखनऊला आहे. तिचं आनंदी असून तिचं लग्न झालं आहे. त्याचं सगळं श्रेय हे माझ्या कुटुंबाला आणि पत्नीला जाते.