मुंबई : चाळीस दिवसांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी बुधवारी (21 सप्टेंबर 2022)  जगाचा निरोप घेतला. यानंतर आज (गुरुवारी) दिवंगत विनोदवीराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मानने राजू श्रीवास्तव यांना अग्नी दिला आणि राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले. एकीकडे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत, तर दुसरीकडे स्मशानभूमीतही चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. (raju srivastava cremated)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 42 दिवसांपासून सुरु असलेली राजू यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रेक्षकांनी आपल्या विनोदाने पोट धरुन हसायला लावणारा विनोदवीर चाहत्यांना रडवून पंचतत्वात विलीन झाला आहे. आता राजू आपल्या आठवणीत असतील. एक कलाकाराचा कधीही अंत होत नाही, कारण त्याची कला कायम आपल्याला प्रेरणा देत असते. (raju srivastava last video)



दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांचं बुधवारी निधन झालं.


नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा (gajodhar bhaiyya), मग तो टीव्ही स्क्रीनवर असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू यांचं निधन धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजू यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही.