Raju Srivastava Death LIVE Update: राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे आज सकाळी निधन झाले. एक कलाकार ज्याने लोकांना हसायला शिकवले. आपल्या विनोदाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले, ज्यांना ‘गजोधर’ म्हणून श्रेय दिले जाते. खूप संघर्ष करून तो इथपर्यंत पोहोचले होते. राजू श्रीवास्तव यांचे जन्माचे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूर येथे झाला. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांचे नाव रमेशचंद्र श्रीवास्तव होते, ते कवी होते. लोक त्यांच्या वडिलांना 'बलाई काका' म्हणून हाक मारायचे. राजू श्रीवास्तव यांनी 1 जुलै 1993 रोजी शिखा हिच्याशी लग्न केले. दोघांना अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. 


लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचे होते. कारण त्यांचा मिमिक्री सेन्स खूप चांगला होता. त्यांनी देशात केवळ कॉमेडी करुन नाव कमावले नाही तर परदेशातही परफॉर्म केले.


‘गजोधर’ म्हणून प्रसिद्धी 


पाकिस्तान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची खिल्ली उडवू नये म्हणून त्याला अनेक वेळा धमकीचे फोन आले. त्यांच्या लुकमुळे त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांनी नेहमी अमिताभ बच्चन यांची नक्कल केली आणि  ‘गजोधर’ बनून सर्वांना हसवले आणि त्यामुळेच ते घराघरात लोकप्रिय झाले.


राजू श्रीवास्तव यांचे अनेक सिनेमात काम


राजश्रीच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटात त्यांना छोटी भूमिकेची ऑफर आली होती. यापूर्वी ते बाजीगर आणि बॉम्बे टू गोवामध्येही दिसले होते. जेव्हा त्याने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये स्टँड-अप कॉमेडियन म्हणून भाग घेतला आणि दुसरे उपविजेता बनले, तेव्हा त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पण त्याचा प्रवास इथेच थांबला नाही. त्यानी पुन्हा एकदा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-चॅम्पियन्स' मध्ये भाग घेतला आणि नंतर शो जिंकला, त्यानंतर त्याला 'द किंग ऑफ कॉमेडी' ही पदवी मिळाली.


राजू श्रीवास्तव 'बिग बॉस' आणि 'बिग ब्रदर'मध्येही सहभागी झाले होते याशिवाय ते पत्नी शिखासोबत 'नच बलिए-6'मध्येही दिसले होता. ते 'कॉमेडी का महामुकाबला'मध्येही दिसला आहे. याशिवाय राजू श्रीवास्तव कपिल शर्मा याच्या लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मध्येही दिसला होता.


राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीची चुणूक दाखवून राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये ते कानपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून राजकारणी म्हणून रिंगणात उतरले. तथापि, त्याच वर्षी 11 मार्च रोजी त्यांनी पक्षाच्या स्थानिक घटकांकडून कोणताही पाठिंबा मिळत नसल्याचा दावा करत त्यांचे तिकीट परत केले. त्यानंतर भाजपमध्ये दाखल झालेत.  ‘स्वच्छ भारत अभियान’ याचा ते एक हिस्सा होता.