मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिथे राजूवर उपचार सुरू आहेत. कॉमेडियन डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मधल्या काळात कॉमेडियनच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांची चिंता अधिकच वाढली होती. मात्र त्यानंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या आरोग्य अपडेटनुसार, कॉमेडियनची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


एम्समधील डायरेक्टरने सांगितली मोठी गोष्ट
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, आतापर्यंत कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यासोबतच ही रुग्णाच्या कुटुंबीयांची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणं योग्य नाही, असं संचालक म्हणाले.


इंफेक्शन झालं कमी
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी नुकतीच कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राजूची प्रकृती पाहून एका ज्येष्ठ महिला डॉक्टरांनी सांगितलं की, कॉमेडियनला झालेला संसर्ग आता कमी होत आहे.