मृत्यूच्या दारात Raju Srivastava? डॉक्टरांकडून मोठी Update
पत्नी आणि मुलीला देखील राजू यांना भेटण्याची परवानगी नाही, कुटुंबिय आणि चाहचे चिंतेत
मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. रोज त्यांच्या प्रकृतीबद्दल नवे अपडेट समोर येत आहे. राजू कधी ठणठणीत होतील आणि पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करतील याच प्रतीक्षेत चाहते आणि कुटुंब आहेत. गेल्या 41 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या व्हेंटिलेटरचा पाईप बदलला होता, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका होऊ नये.त्याचवेळी संसर्गाच्या भीतीने त्यांची पत्नी आणि मुलीला भेटण्याची परवानगीही नसल्याचं डॉक्टरांनी (Raju Srivastava doctor) सांगितलं आहे.
दिपू श्रीवास्तव म्हणाले, 'राजू यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागत आहे. पण आम्हाला विश्वास आहे की, राजू लवकरच ठिक होतील. सध्या राजू व्हेंटिलेटरवर आहेत...' (Dipu Srivastava on Raju Srivastava's health)
कशी आहे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती? (Raju Srivastava's health update)
राजू अद्यापही शुद्धीवर न आल्यामुळे कुटुंब आणि चाहते चिंतेत आहेत. जोपर्यंत राजू श्रीवास्तव शुद्धीवर येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते गेल्या 40 दिवसांपासून रुग्णालयात आहेत.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)