मुंबई : राखी सावंत आणि आदिल सध्या खूप चर्चेत आहेत. राखीला तिच्य नव्या रिलेशनशिपमुळे खूप खुश आहे. आता सगळीकडे तिच्यासोबत फक्त आदिल दिसतो... राखी जर कोणाबद्दल जास्त बोलत असेल तर तो आदिल आहे. पण इतकं प्रेम असताना दोघांमध्ये भांडण कसं झालं.. राखी आणि आदिलने एकमेकांना का मारलं? खरंतर, सोशल मीडियावर राखी आणि आदिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राखी आदिलसोबत भांडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडण नाही तर आहे प्रेमाचा मुरांबा
राखी सावंत आणि आदिल यांच्यात किती प्रेम आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे. जेव्हापासून राखीच्या आयुष्यात आदिल आला आहे, तेव्हापासून राखीमध्येही बरेच बदल झाल्याचं त्याच्या चाहत्यांना दिसत आहे. मग तो ड्रेसिंग सेन्सचा विषय असो वा बोलण्याच्या पद्धतीचा. आता या दोघांचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर आला आहे. ज्यामध्ये राखी आदिलसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून चाहतेही खूश आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आदिलसोबत करणार लग्न ?
हा प्रश्न राखी सावंतला अनेकदा विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर, आता राखीने खुलासा केला आहे की, ती सध्या आदिलला खूप चांगल्या प्रकारे समजून घेत आहे. त्याचबरोबर आदिलच्या बहिणीचं लग्न बाकी असून त्यानंतर दोघंही लग्नाचा निर्णय घेतील. त्याचबरोबर राखीच्या आईलाही आदिल खूप आवडतो. अलीकडेच राखीने खुलासा केला की, जेव्हा तिने तिच्या आईला आदिलबद्दल सांगितल तेव्हा ती रडू लागली आणि त्याचवेळी भावूक होऊन तिने सांगितले की, तिच्या मुलीने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे पण आता तिने तिचं आयुष्य मोकळेपणाने जगलं पाहिजे.