मुंबई : सलमान खान बिग बॉसचा सर्वात दमदार होस्ट आहे. या रियालिटी शो मधील त्याचा कडक आणि मजेदार अंदाज चाहत्यांबरोबरच घरातील सदस्यांनाही खूप भावतो. सलमानसमोर बिग बॉसच्या घरातील खूप कमी लोक तोंड उघडतात. पण या घरात राहीलेल्या दोन स्पर्धकांनी सलमान खानजवळ अनोखी मागणी केली आहे. सलमान खानच्या रेस ३ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. या सिनेमाने ३ दिवसात १०० कोटी रुपयांची धमाकेदार कमाई केली.


केली ही अनोखी मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचदरम्यान राखी सावंत आणि अर्शी खानने सलमानकडून या कमाईचा त्यांचा वाटा मागितला आहे. त्यांनी सलमान खानकडे तब्बल ५ कोटी रुपये मागितले आहेत. अलिकडेच त्या दोघी मुंबईतील गोल्ड अवॉर्ड्समध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळेस पत्रकाराने रेस ३ च्या १०० कोटीच्या कमाईबद्दल विचारले असता अर्शी खान म्हणाली की, सलमान खानने सिनेमाच्या कमाईतील कमीत कमी ५ कोटी रुपये मला द्यायला हवेत. 



राखी सावंतचा अजब दावा


अर्शीने ही मागणी केल्यावर राखी सावंत तरी कशी मागे राहील. यावर राखी सावंत म्हणाली की, मी देखील रेस ३ चा प्रचार केला आहे. मी लोकांना हा सिनेमा बघण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. म्हणून मलाही काही पैसे मिळायला हवेत. सलमानच्या दमदार अभिनयाने प्रभावित झालेली राखी म्हणाली की, सिनेमात सलमान हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉनसारखा दिसला आहे. तर अर्शी म्हणाली की, सलमानमुळेच मी हा सिनेमा पाहिला आणि सलमानसारखे कोणीच नाही.



सिनेमाची दमदार कमाई


रेस ३ हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कमाई करत १०० कोटींचा गल्ला पार केला. या सिनेमात सलमान शिवाय बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस, डेजी शहा, साकिब सलीम आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.