मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीची ड्रामा क्विन राखी सावंत गेल्या दोन वर्षांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले होते.पण व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राखीचा पती दिसतचं नव्हता. त्यानंतर राखीचा पती रितेश 'बिग बॉस 14' मध्ये दिसणार आहे, अशा चर्चा रंगल्या. पण तो काही 'बिग बॉस 14' दिसला नाही. पण आता हा लपंडावचा खेळ संपला असून रितेश आणि राखी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एकत्र दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये राखी सावंत हातात आरतीचे ताट धरून उभी आहे. ती एका व्यक्तीचे स्वागत करत आहे. तिच्यासोबत बिग बॉसचे स्पर्धक आहेत. व्हिडीओमध्ये राखी 'मेरा पिया घर आया ओ राम जी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ...



पतीची आरती करताना राखी म्हणते ,'11 देशांचे पोलीस रितेशचा शोध घेत होते, आता तू अखेर समोर आला आहेस...' त्यानंतर राखी पती रितेशच्या पाया पडताना देखील दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.. 'बिग बॉस 14' मध्ये नाही तर राखी पती रितेशसोबत 'बिग बॉस 15'मध्ये एकत्र दिसणार आहे.