राखी सावंतचं मोठं वक्तव्य; म्हणाली, माझं आयुष्य खराब...
`बिग बॉस` फेम अभिनेत्री राखी सावंतचं वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असतं.
मुंबई : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री राखी सावंतचं वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असतं. कधी अचानक लग्न, कधी ब्रेकअप तर कधी प्रेमप्रकरण यामुळे ते नेहमीच चर्चेत असते. सध्या ती म्हैसूरचा बिझनेसमन आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. दोघंही अनेकदा रोमँटिक क्षण शेअर करताना दिसतात. मात्र असं दिसतंय की, आजकाल त्यांच्यामध्ये काहीच ठीक नाहीये.
राखी सावंत-आदिल दुर्रानीमध्ये एक्स गर्लफ्रेंडची एंट्री
खरंतर राखी सावंतने दिलेल्या एका मुलाखतीत तिचं आणि आदिलचं नातं ठीक नसल्याचा खुलासा केला आहे. आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडमुळे हे घडत आहे. राखीने सांगितलं की, आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. ती सतत आदिलला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचंही अभिनेत्रीचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर आदिल अभिनेत्रीचीही फसवणूक करत असल्याचा आरोप तिच्या एक्स गर्लफ्रेंडने केला आहे.
आदिलसोबतच्या नात्याबाबत राखी सावंतचा खुलासा
राखी सावंत म्हणाली, ''माझं आदित्यवर प्रेम आहे आणि मला माहित आहे की, तोही माझ्यावर प्रेम करतो. मात्र, सध्या आमच्यात काही ठीक चाललं नाही. आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. दररोज ती त्यांना कॉल करते आणि स्वत: ला जीवे मारण्याची किंवा काही खाजगी व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देते. ती मला फोन करते आणि म्हणते, 'आदिल तुझा वापर करतो आणि तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो.' यामुळे आम्ही खूप अस्वस्थ आहोत. यावर आम्ही सतत चर्चा करत असतो. मला आता काय करावं हे माहित नाही. मला वाटतं की, मी प्रेमाच्या बाबतीत दुर्दैवी आहे."
राखी सावंत ट्रोल्सवर बोलत आहे
राखी सावंत जेव्हा एक्स पती रितेशसोबत होती तेव्हा तिला गोल्ड डिगर म्हटलं जायचं आणि आता जेव्हा ती आदिलसोबत असते तेव्हा लोक तिला शुगर मम्मा म्हणतात. यावर अभिनेत्री म्हणाली, "ते मला शुगर मम्मा म्हणतात कारण मी आदिलपेक्षा मोठी आहे. मी माझ्यापेक्षा सात वर्ष लहान मुालाल डेट करतेय. त्यामुळे माझी चेष्टा केली जाते, पण मी फक्त वयानेच नाही तर पैसा आणि स्टेटसनेही मोठी आहे. असं म्हणतात ना की, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है केहेना.' म्हणूनच मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते.