मुंबई : छापलेली लग्नपत्रिका आणि ब्रेकअपमुळे चर्चेत आलेला 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचा एक्स-बॉयफ्रेंड दीपक कलालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर रेंगाळताना दिसतोय. या व्हिडिओत दीपक कलाल याला एक व्यक्ती मारहाण करताना दिसतेय. खुद्द दीपक कलाल यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पण, नेटीझन्सनं मात्र हा पब्लिक स्टंट असल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त केल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियाज गॉट टॅलेंट' नावाच्या एका रिऍलिटी शोनंतर दीपक पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्यानंतर दीपकचे अनेक 'कॉमेडी' व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत होते... परंतु, हे व्हिडिओ 'कॉमेडी' नाही तर वादग्रस्त होते. अशाच काही व्हिडिओंवर मारहाण करणारा व्यक्ती नाराज असल्याचं दिसतंय. विनोदाच्या नावावर बाष्कळपणा केल्याचं सांगत त्यानं दीपकला ठोकून काढलंय. या व्हिडिओंचा लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, असे व्हिडिओ पुन्हा बनवायचे नाहीत, अशी तंबीही त्यानं दीपकला दिलीय. 


दीपक नंदाल असं या मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असल्याचं समोर येतंय. रॅपर फझीलपुरिया याचा मॅनेजर असल्याचं नंदाल सांगतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गुरुग्रामचा आहे. 



याबद्दल राखीला विचारण्यात आलं तेव्हा, मला नाही वाटत की दीपकनं काही चुकीचं केलंय. पण मी लोकांना आवाहन करतेय की त्यांनी कायदा हातात घेऊ नये, अशी प्रतिक्रिया तिनं दिलीय. गेल्या ३१ डिसेंबर रोजी राखी आणि दीपक बोहल्यावर चढणार असल्याचं सांगितलं गेलं होतं... पण नंतर मात्र हा 'प्रोग्राम' रद्द करण्यात आला.