मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखी सध्या आदिल खान दुर्रानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बऱ्याचवेळा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. खरं तर राखी 'बिग बॉस 16' मध्ये जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिनं अनेकदा याचा उल्लेख केला आहे. सलमान किंवा निर्मात्यांनी तिला शोमध्ये बोलावून आदिलशी लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. इतकंच नाही तर यावेळी ती सीझनही जिंकणार नाही असंही तिने म्हटलं आहे. घरी बसूनच लग्न करायचं.


बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आदिलच्या पाठीमागे राखी वाईट काम करत आहे. ती पापाराझीला म्हणते, 'मला माहित नाही की नल्ला कुठे आहे. तो एक मोठा लांडगा आहे. तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. काय चिकटून असतो हे मी बोलू शकत नाही. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे कधी जाऊ नका. त्याला हे सांगू नका.'


आणखी वाचा : वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून बसेल धक्का


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत


राखी म्हणाली, 'माझी इच्छा आहे की हा साला आदिल बिग बॉसमध्ये गेला नाही पाहिजे. त्याचा असा निरागस चेहरा जो आपण पाहतो, त्या चेहऱ्यामागे लांडगा असतो ना, तो लांडगा हा आहे. मग तो किती मोठा लांडगा आहे हे जगाला कळेल. तो एकदा आत गेला तर त्याला डाळ आणि पिठाचा भाव कळेल. त्याला वाटतं की आत एक पार्टी होते. जिलेबी विकत आहेत. तिथे काहीच नाही कपडे धुवावे लागतात. भाकरीसाठी संघर्ष करावा लागतो. आदिल जेवणासाठी तरसेल.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यानंतर, आदिल आल्यावर ती कॅमेऱ्यावर बोलते, 'मी त्याला लांडगा बोलले हे त्याला सांगू नका. आदिलला गाडीतून उतरताना पाहिल्यानंतर राखी लगेच त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली आणि आय लव्ह यू म्हणते. नंतर दोघांनीही मिठी मारली.'


आणखी वाचा : 'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ


पुढे राखी बोलते, 'मी तुझी किती स्तुती केली हे तुला माहितीये ना. तुम्ही खूप चांगले आहात.' यावर आदिल बोलतो, 'अरे मी कौतुकास पात्र नाही.' तेव्हा राखी म्हणाली, 'तू खूप निरागस आहेस. मी असेही म्हणाले की तू बिग बॉसमध्ये गेलात तर तुचं विजेता असणार.'