मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच राखीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रुग्णालयातील आहे. व्हिडीओमध्ये राखीला रुग्णालयात दाखल केल्याचं दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द राखीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखी रुग्णालयात डान्स करताना दिसत आहे. तिच्यासोबत बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani) देखील आहे. राखी रुग्णालयात डान्स (Dance) का करते? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'कोणतीही परिस्थिती असली तरी डान्स कधीही सोडणार नाही...' असं म्हणत शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णालयात डान्स असं लिहिलं आहे. राखीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. 


राखीच्या खासगी आयुष्या विषयी बोलायचे झाले तर, आजकाल राखी दुबईस्थित बिझनेसमन आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बऱ्याचवेळा ते दोघं एकत्र दिसतात. राखी आणि आदिलची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.आदिल विषयी बोलताना राखी म्हणाली की, 'असं वाटतं की देवानं माझ्यासाठी त्याला पाठवलं आहे.'