मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच चर्चेचा विषय असते. ती जशी प्रसारमाध्यमांतून चर्चेत असते, तशीच ती सोशल मीडियातूनही चर्चेत असते. मुळात राखीलाही सोशल मीडियावर सतत कार्यरत रहायला आवडते असे दिसते. नुकताच तिचा सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती काहीसे विचित्र हावभाव आणि वर्तन करताना दिसते आहे.


कोणाचे ऐकेल ती राखी कसली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओच्या सुरूवातीला राखी विमानातील प्रवाशासोबत बोलताना दिसते. त्यानंतर ती त्या सहप्रवाशाला म्हणते की, मला डान्स करावा वाटतोय. राखीने आपल्या मनातील विचार विमानातील कर्मचाऱ्यांनाही बोलून दाखवला. पण, कर्मचाऱ्यांनी तिला विमानात डान्स करायला नकार दिला. पण, कोणाचे ऐकेल ती राखी कसली? डान्स करण्याची इच्छा राखीच्या मनात इतकी होती की, अखेर ती विमानाच्या टॉयलेटमध्ये गेली. तिने टॉयलेटमध्ये जाऊन डान्स करण्याचा प्रयत्न केला.


'मला डान्स आलाय'


'मला डान्स आलाय', असेही राखी बोलत असल्याचे व्हिडिओत दिसते. खरे तर, लोकांना शिंक, खोकला किंवा तत्सम नैसर्गिक विधी तीव्रतेने येतात. पण, डान्स येणे हा प्रकार कदाचीत राखीबाबतच घडू शकतो. दरम्यान, या व्हिडिओत राखीच्या डोक्यात #kikichallenge चा फिव्हर असल्याचे दिसते. राखीचा हा हटके व्हिडिओ तिचे फॅन्स चांगलाच एन्जॉय करत आहेत.