मुंबई : राखी सावंतला कॉन्ट्रोव्हर्सी आणि ड्रामा क्वीन म्हटलं जातं. काहि दिवसांपुर्वीच तिने पोस्ट शेअर करत पती रितेशसोबत घटस्फोटाची माहिती दिली. काही वेळापूर्वीच राखीच्या डोक्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा ज्वर चढतोय. आता राखीच्या आयुष्यात काही असं घडलं आहे ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे ही प्रथा जपत त्यांनी स्वत:शी संबंधित एक धक्कादायक अपडेट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच राखी सावंतने सोशल मीडियावर तिचं प्रेम जाहीर केलं होतं. तिने चाहत्यांना सांगितलं की, ती आता सिंगल नाही, तर आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. राखीनेही आदिलला तिच्या बॉयफ्रेंडला पापाराझींसमोर सांगितलं होतं. आता रिपोर्ट्सनुसार, ड्रामा क्वीननेही आदिलसोबत एंगेजमेंट केली आहे. खुद्द राखीने एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. तिची एंगेजमेंट रिंग दाखवत ती म्हणाली, 'तो माझं प्रेम आहे आणि तो माझी कोणतीच पब्लिसिटी नाही'.


तिच्या या वक्तव्यानंतर ती तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबद्दल बोलत असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी, आपल्या नवीन बॉयफ्रेंडचं कौतुक करताना राखी म्हणाली, 'जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो आणि देवाने मला दिलं आहे. आदिल एक माझ्या आयुष्यातली प्रिय व्यक्ती आहे'. नुकताच राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.


ज्यामध्ये ती एका पुरुषासोबत दिसली होती. या दोघांची अनेक फोटो मिसळून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आदिलने राखीला BMW कार भेट दिली
इतकंच नाही तर गेल्या महिन्यात राखी एका नवीन बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरताना दिसली होती. त्यानंतर राखीने सांगितलं की, तिला तिच्या बॉयफ्रेंड आदिलने ही लक्झरी कार गिफ्ट केली आहे. 'ही कार मला माझ्या प्रियकराने भेट दिली आहे', असं राखीने म्हटलं होतं.