Rakhi Sawant Hospitalized : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडली आहे. राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. Viral bhayani ने याबाबतचे वृत्त दिले आहे. राखी सावंतला हृदयाशी संबंधित गंभीर आजार झाल्याची माहिती  माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखी सावंत रुग्णालयात दाखल असून बेडवर झोपलेली दिसत आहे. राखी सावंतला हृदयाशी संबंधित  त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांकडून अद्याप राखी सावंतच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असे Viral bhayani  ने त्याच्या  इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे. Rakhi seems to have to be immediately hospitalized due to some heart-related ailment. We await further information from the doctors. We wish her a speedy recovery and cannot wait for her nonstop madness soon. #GetWellSoonRakhi #SendingLove अशी पोस्ट Viral bhayani ने केली. 



राखी सावंत ही बॉलिबुडची ड्रामा क्वीन आहे. विविध कारणांमुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. पती आदिल खान सोबतच वाद आणि घटस्फोट हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दरम्यान राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने दुसरं लग्न केलंय. अभिनेत्री सोमी खानसोबत त्यानं लग्नगाठ बांधली. आदिलने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.