मुंबई : बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत आज तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईत जन्मलेली राखी सावंत अनोख्या कामांमुळे नेहमीच चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. राखीचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा त्याच्या फॅन फॉलोइंगची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरिबीत बालपण
राखी सावंतचं खरं नाव नीरू भेडा आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी अभिनेत्रीने तिचं नाव बदललं, राजीव खंडेलवालच्या जज्बात शोमध्ये राखीने सांगितलं की, ती अत्यंत गरीब कुटुंबातून आहे, तिची आई रुग्णालयात आयाचं काम करत होती आणि वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते, त्यामुळे तिला खूप कठिण दिवसातून जावं लागत होतं. 


मामाने केला छळ 
राखी सावंतने मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची खूप आवड होती. पण ती जेव्हा डान्स करायची तेव्हा तिचे मामा तिला खूप मारायचे. कारण मुलींना त्यांच्या कुटुंबात नाचण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत तिचं पालनपोषण झालं आहे.


मिका सिंगने केलं किस
राखी सावंत जर कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असेल तर मिका सिंगही किंगपेक्षा कमी नाही. मिकाने एका पार्टीत राखीला किस केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राखीने (राखी सावंत) मिकावर विना परवानगी किस केल्याचा आरोप केला होता. काही वेळाने मीट ब्रदर्ससोबत मिका सिंगनेही या वादावर एक गाणंही तयार केलं.


राखी सावंतनेही रिअॅलिटी शोच्या दुनियेत 'राखी का स्वयंवर' नावाचा रिअॅलिटी शो सुरू केला. 2009 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये राखीने टोरंटोमधील एका स्पर्धकासोबत लग्नही केलं आणि काही महिन्यांनी वेगळं होण्याची घोषणाही केली. राखीने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. 2005 मध्ये आलेले तिचं 'परदेसिया' गाणं आजही लोकांना खूप आवडतं.