Rakhi Sawant Mother Death: राखी सावंतला मातृशोक! ब्रेन ट्युमरविरुद्धची जया सावंत यांची झुंज अपयशी
Jaya Sawant passed away: मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. राखीने रुग्णालयामधून व्हिडीओ शेअर करत आपल्या आईच्या प्रकृतीसाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी असं आवाहन केलं होतं.
Rakhi Sawant Mother Jaya Sawant Passed Away: अभिनेत्री राखी सावंतची आई (Rakhi Sawant Mother) जया सावंत यांचं शनिवारी निधन झालं. त्याच्यावर मुंबईमधील रुग्णालयात ब्रेन ट्युमरवरील (Brain Tumour) उपचार सुरु होते. मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला (Jaya Sawant Passed Away). मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. राखीने तिच्या चाहत्यांना आपल्या आईसाठी प्रार्थना करावी अशीही विनंती केली होती. मात्र आज राखीच्या आईचं उपचादारादरम्यान निधन झालं. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून जया सावंत यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
आधी कॅन्सवर केली मात
जया सावंत (Jaya Sawant) यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली होती. मागील तीन वर्षांपासून जया सावंत यांना प्रकृतीसंदर्भातील गंभीर आजारांनी ग्रासलं होतं. राखी अनेकदा आपल्या आईच्या आजरपणादरम्यानच्या उपचाराचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करायची. तिने सोशल मीडियावरुन आपल्या आईच्या प्रकृतीबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. राखीने आपल्या आईवरील उपचारांसाठी सलमान खानने अनेकदा मदत केल्याचा उल्लेख केला होता. सलमान अनेकदा आईच्या तब्बेतीसंदर्भात चौकशी करतो असंही राखी म्हणाली होती.
अंबानींनी केली मदत
राखीच्या आईला तीन वर्षांपूर्वी कॅन्सरची बाधा झाली होती. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचं समोर आलं आणि त्यावरील उपचार सुरु करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आईच्या उपचारांसाठी मदत करत असल्याचंही सांगितलं होतं. "मी अंबानी यांचे आभार मानते. अंबानीजी माझ्या आईवर उपचार करण्यासाठी मदत करत आहेत. रुग्णालयामधील सध्या जे दर आहेत त्यापेक्षा कमी दरात त्यांच्या मदतीमुळे माझ्या आईवर उपचार सुरु आहेत," असंही राखी म्हणाली होती.
रुग्णालयातून पोस्ट केलेला व्हिडीओ
राखी सावंत ही एकीकडे आईच्या तब्बेची काळजी घेत असतानाच इतरही अनेक प्रकरणांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये अगदी शर्लीन चोप्राच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीपासून ते आदिलबरोबर झालेल्या लग्नापर्यंतच्या मुद्द्यांवरुन राखी सातत्याने बातम्यांमध्ये झळकत आहे. मात्र या सर्व गोंधळदारम्यानही ती आवर्जून आईसाठी रुग्णालयामध्ये जात होती. काही दिवसांपूर्वीच तीने आईचा उपचार घेतानाचा व्हिडीओ रुग्णालयामध्ये पोस्ट केला होता.