Rakhi Sawant New Song Jhootha : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)  ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि पती आदिलमध्ये (Adil Khan Durrani) सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत होती. राखीनं पती आदिलवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. राखीनं आदिलवर फसवणूक आणि मारहाण केल्याचा दावा केला होता. इतकंच काय तर एका इराणी मुलीनं देखील त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर राखी सावंतचं एक गाणं देखील आलं आहे. या गाण्याचं नाव 'झूठा' (Jhootha) असे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंतच्या प्रदर्शित झालेल्या या गाण्यात राखीनं थोडक्यात तिची आणि आदिलची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे अनेकांचे म्हणणे. यावेळी गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान, त्यांची भेट कशी झाली ते दाखवण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री कशी झाली आणि मैत्रीचे रुपांतर कसे झाले. इतकंच काय तर त्या दोघांचा विवाह देखील दाखवण्यात आला आहे. त्यानंतर कशा प्रकारे तिचा प्रियकर तिला धोका देतो आणि ती मीडियासमोर त्याचं सत्य समोर आणते आणि प्रियकराला तुरुंवास भोगावा लागतो ते दाखवले आहे. 


काय म्हणाले नेटकरी!


राखीच्या या गाण्यावर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हे गाणं राखीच्या आयुष्यावर आधारीत आहे. तिनं तिच्या आयुष्यात जे काही सहन केलं ते यात पाहायला मिळत आहे. राखी तुला आमचा पाठिंबा आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला गाण्यातील सगळ्यात शेवटचा सीन आवडला. ज्यात ती तिच्या डोक्यावर मुकुट ठेवताना दिसते. हे मुकुट आता खाली पडायला नको. मुलींनी असंच राहायला पाहिजे. तू राणी आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जे लोक बोलतात की हे फक्त नाटक आहे, त्यांना मला सांगायचं आहे की दु: ख हे दु: ख असतं. तिनं तिच्या आयुष्यातलं सगळं दु: ख या गाण्यात दाखवलं आहे.'



हेही वाचा : 'लागीर झालं जी' मधल्या शितलीचं आणि अरुंधतीचं आहे 'हे' नाते!


राखीच्या प्रदर्शित झालेल्या हा गाण्याचा व्हिडीओ 979K लोकांनी पाहिला आहे. हे गाणं अल्तमाश फरिदीनं गायलं आहे. तर या गाण्यात राखीसोबत दिसणाऱ्या अभिनेत्याचे नाव सलमान शेख असे आहे. तर या गाण्याची निर्मिती अभय बन्सलनं केली आहे. तर दिग्दर्शन कोरिओग्राफी ही मुदस्सर खाननं केली आहे.