मुंबई : काही दिवसांपूर्वी सरकारने रात्री दहाच्या पूर्वी कंडोमच्या जाहिराती टीव्हीवर न दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णायाचा काहींनी निषेध केला तर काही जण या निर्णायाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.  


सर्वसामान्यांप्रामाणेच अभिनेत्री राखी सावंतनेदेखील आपली मतं व्यक्त केली आहे. राखीने सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र मतं प्रदर्शित केली आहेत. 


काय आहे राखी सावंतचं मत ?   


एका वृत्तपत्रकाला मुलाखत देताना राखी सावंत म्हणाली, ' मी लवकरच एका कंडोमच्या जाहिरातीमध्ये काम करणार आहे. हे समजताच कंडोमच्या अ‍ॅड रात्री दहापूर्वी न दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. '


राखी सावंतप्रमाणेच बॉलिवूडस्टार्स बिपाशा बासू, करणसिंह ग्रोव्हर, सनी लिओनी यांनीदेखील कंडोमच्या  अ‍ॅड केल्या आहेत. मात्र त्यांना विरोध झाला नाही. अशी तक्रार राखीने व्यक्त केली आहे. 


सरकारला वाटतं जनतेला 'एड्स' व्हावा 


अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच सुरक्षित शरीर संबंध ठेवण्यासाठी कंडोम फायदेशीर आहे. तरूणांना वेळीच कंडोमच्या वापराबाबत माहिती देणं गरजेचे आहे. पण सरकारच्या नव्या निर्णयामुळे लोकांपर्यंत माहिती पोहचणार नाही. 


सरकारलाच वाटते की जनतेला 'एड्स' व्हावा अशा भाषेत राखीने आपली मत  व्यक्त केली आहेत.  
सरकारला वाटत असेल तर अ‍ॅड सेन्सॉर करावी किंवा एडिट करावी.