नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंतचं परदेशी महिला कुस्तीपटूने आदळल्यानंतर कंबरेला मोठी दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान राखी सावंतशी झी डिजिटल टीमने रूग्णालयात संपर्क केल्यानंतर, राखीने म्हटलं आहे की, हा माझ्याशी मोठा धोका आहे. ही काही कुस्तीची स्पर्धा नव्हती, हा एक डान्सचा कार्यक्रम होता, त्या दरम्यान परदेशी महिला कुस्तीपटून आपल्याला वर उचलून जमीनीवर आदळल्याचं राखी सावंतने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत राखी सावंतला कंबरेला लागलं आहे. राखी सावंतला हरियाणातील एका कुस्तीच्या रिंगच्या कार्यक्रमात परदेशी रेसलर रेबलने आदळल्यानंतर, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी राखीला रिंगमधून २ जणांनी उचलून आणलं.


यावर राखी सावंतने म्हटलं आहे, 'मला जरा बरं होऊ द्या, मग तिला मी, त्या 'फिरंगी'ला रिंगमध्येच पक़डून मारेल, तिला मला मारण्यासाठी कुणी पाठवलं आहे ते मला माहित नाही. रेबलने माझ्यावर हा हल्लाच केला आहे.'


राखी सावंत आणखी पुढे म्हणाली, 'मी त्या फिरंगीला धरून मारेल, मी कालपासून हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या कमरेला दुखणं कमी व्हावं यासाठी इंजेक्शन्स सध्या दिले आहेत, माझ्या शरीराला अनेक ठिकाणी इजा झाली आहे. मला एक नक्की वाटतंय की, तिला धरून मारावं.'