या अभिनेत्रीने केला खुलासा, राम रहिमच्या रूममध्ये पाहिली व्हायग्रा
बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
मुंबई : बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
या सिनेमात ती हनीप्रीतची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान राखी सावंतने प्रसारमाध्यमांशी बोलताना राम रहिमबद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. तर ‘द क्विंट’ ला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, तिला राम रहिमबाबत अनेक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळेच ती या बायोपिकमध्ये काम करत आहे. हनीप्रीतचा रोल ती खूप चांगला साकारू शकते, असे तिचे म्हणणे आहे.
या सिनेमा अशा अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत, ज्या केवळ तिलाच माहिती आहेत. ती म्हणाली की, ‘या सिनेमाच्या माध्यमातून मला बाबाच्या अंधभक्तांचे डोळे उघडायचे आहे. जेणेकरून ते अशा बाबांच्या मागे लागणार नाहीत’. राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून या सिनेमाचं टायटल ‘अब इंसाफ होगा’ असं ठेवण्यात आलं आहे. अर्थातच या सिनेमात राखी सावंतचा आयटम नंबर असणार आहे.
राखीने मुलाखतीत सांगितले की, ‘मला त्या बाबाची ब-याच गोष्टी अनेक वर्षांपासून माहिती आहेत. मी हनीप्रीत आणि राम रहिम यांच्या असलेल्या अफेरला समोर आणण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. त्यांनी सुरुवातीला मला त्यांच्यात वडिल आणि मुलीचं नातं असल्याचं सांगितलं होतं. पण जेव्हा मी बाबाच्या रहस्यमयी गुहेत गेली, तेव्हा मी तिथल्या गोष्टी पाहून हैराण झाले’.
राखीने पुढे सांगितले की, ‘मला एकदा मॅरिएटचे सेक्रेटरी सीपी अरोराने राम रहिमला भेटण्यासाठी बोलवले होते. जेव्हा मी त्याला भेटायला गेली तेव्हा त्याच्या खोलीतील ठेवलेल्या व्हायग्रावर माझी नजर गेली. ते पाहून मी थक्क झाले होते’.