मुंबई : राखी सावंतने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत मोठी माहिती शेअर केली आहे. राखीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केलंय की, ती पती रितेशपासून विभक्त होत आहे. राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका लांबलचक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टद्वारे राखीने ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं पोस्टमध्ये म्हटलं आहे
राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. राखी सावंतने पोस्टमध्ये लिहिलंय की, 'सगळे चाहते आणि माझ्या प्रियजनांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मी आणि रितेश एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. 'बिग बॉस' नंतर बरंच काही घडलं आणि अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या.आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी आम्ही आमचं आयुष्य वेगळं घालवायचं ठरवलं आहे.



कामवर करायचं आहे फोकस
राखी सावंतने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, 'व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी हे सगळं घडलं याचं मला खूप वाईट वाटतं. पण निर्णय घ्यायचा होता. आशा आहे की, रितेशसोबत सगळं काही ठीक आहे. सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचं आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल सर्वांचे आभार. राखी सावंत.