Rakhi Sawant Talk About Miscarriage and physical Relation With Husband Adil Khan : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीनं आदिल खान दुरानीवर (Adil khan) गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, राखीनं आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता राखीनं आणखी एक धक्कादायक खुलासा करत गर्भपात झाल्यानंतर काय झालं या विषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘इन्स्टंट बॉलिवूड’ च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी आदिलवर आरोप करताना दिसत आहे. राखी बोलते की "बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझा गर्भपात झाला. याबाबतही कुणाशी काही बोलू नकोस, असं आदिलने सांगितलं होतं. गर्भपात झाल्यानंतर तीन महिने शरीरसंबंध ठेवू नका, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आदिलनं 10 दिवसांतच माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवले."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीचा गर्भपात होण्या मागचं कारण काय आहे? 


यावर पुढे सांगताना राखी म्हणाली, "गर्भपात झाल्यानंतर जर लगेच गरोदर राहिले तर माझ्या जीवाला धोका असेल असं डॉक्टर म्हणाले होते. बिग बॉसच्या घरात असतानाही मी गरोदर असल्याचं म्हटलं होतं. तिथून बाहेर आल्यानंतर माझी आई आजारी असल्याचं मला कळलं. त्यानंतर लगेच आदिलबरोबर लग्न केल्याचा मी खुलासा केला. इतकंच काय तर आदिलने लग्न झाल्याचंही मान्य केलं नव्हतं. या सगळ्या तणावामुळे माझा गर्भपात झाला." (Rakhi Sawant Mother's Death) 


हेही वाचा : कॉलसेंटरमध्ये काम करणारी 'ही' मध्यमवर्गीय मुलगी आज झालीये प्रसिद्ध अभिनेत्री


राखीनं आदिलवर मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप त्यानंतर रात्री त्याच्यासोबत डिनर डेटला गेली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना घासही भरवला. या डिनर डेटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता काय तर राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. आदिलने राखीला मारहाण केली आणि तिचे दागिने आणि पैसे घेतल्याचा आरोप तिने केला.आदिल खान दुर्रानी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे, असा आरोप करणारा राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची चर्चा सुरु असताना अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला.