मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) त्याचे न्यूड फोटोशूट (Ranveer Singh Nude Photo Shoot) केले आहे. त्याचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरून काही लोक रणवीरला ट्रोल करत आहेत, तर काही लोकांनी त्याचं कौतुकही करत आहेत. नुकतंच बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनेही (Rakhi Sawant) रणवीरच्या न्यूड फोटोंवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेत्याने असे फोटोशूट का केले ते सांगितले. राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये, जेव्हा पापाराझी राखीला विचारतात की रणवीर सिंगचा न्यूड फोटो व्हायरल होत आहेत. तर तुझी प्रतिक्रिया काय आहे असा प्रश्न तिला विचारला. तेव्हा राखी म्हणाली, "तुम्हाला नग्न वाटतं, तुमचे डोळे नग्न आहेत. मला कुठूनही तो नग्न होताना दिसत नाही. माझ्या रणवीर मित्राबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. आदिलही काही बोलू शकत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे व्हिडिओमध्ये राखी रणवीरने हे फोटोशूट का केले हे देखील सांगत आहे. राखी म्हणाली, "यामागे काय कारण आहे, रणवीर सांगू शकत नाही पण रणवीरची मैत्रिण सांगेल. लंडन, अमेरिका आणि दुबईमध्ये खूप गरम होत आहे. फक्त तिथेच नाही तर इथेही खूप गरम होतं आहे. तर माणूस काय करेल, एसी सुद्धा चालत नाही. रणवीर फक्त कपडे काढून आंघोळीला गेला, तेव्हा दोन माकडं त्याचे कपडे घेऊन पळाले. राखी सावंतचा हा फनी व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून लोक त्यावर खूप मजेशीर कमेंट करत आहेत.


दरम्यान, या आधी राखीनं ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपवर तिची प्रतिक्रिया दिली होती. तर, राखी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. राखी मैसूरचा बिझनेसमन आदिल खानसोबत रिलेशनशपिमध्ये आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडिओतही आदिल राखीसोबत दिसत आहे.