मुंबई : राखी सावंत आणि वाद हे काही वेगळं नाही. नेहमी वादात राहणारी राखी सावंत आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंत सध्या एका कंडोम अॅडमुळे चांगलीच ट्रोल होतांना दिसत आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच एक कंडोम अॅडचा व्हिडिओ तिच्या इन्स्ट्राग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये ती कंडोम विषयी बोलतांना दिसत आहे.


हा व्हिडिओ स्वतः राखीने एडिट केला आहे. राखीने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करणं सुरु केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. अलीकडे, राखीने अमेरिका आणि कॅनडामध्ये आपल्या नावाची एक डान्स अकॅडमी देखील सुरु केली आहे.


गुरमीत राम रहीमवर बनणाऱ्या चित्रपटातही ती काम करत आहे. त्य़ाचं देखील काम सुरु आहे. सध्या दिल्लीत या चित्रपटाची शूटिंग चालू आहे. पण सध्या राखी सावंत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.