मुंबई : ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीमुळे चर्चेत आहे. ती रोज आदिलसोबत पोज देताना दिसते. मात्र आता तिच्या बॉयफ्रेंडनेही तिला फसवल्याचं दिसतं. आदिलला पिकअप करण्यासाठी राखी सावंत नुकतीच एअरपोर्टवर पोहोचली होती. मात्र तासंतास वाट पाहूनही आदिल आला नाही. राखी सावंतचं पुन्हा एकदा हार्टब्रेक झालं आणि तिने आपली ही अवस्था मीडियाबाहेर सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नटून-थटून गेलेल्या राखीचा झाला हार्टब्रेक
नुकतीच राखी सावंत मुंबई एअरपोर्टवर दिसली. तिने सूट घातला होता आणि खूप मेकअपही केला होता. पण राखीच्या आयमेकअपची अवस्था बिघडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने स्वतः सांगितलं की ती एअरपोर्टवर थांबली होती पण आदिल दुर्रानी तिला भेटायला आला नाही. ती दोन तास रडत त्याची वाट बघत होती आणि तिच्या डोळ्याचा मेकअप बिघडला. राखीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना वाटत आहे की, मिका आणि रितेशनंतर तिची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे.


आदिल राखीला भेटायला आला नाही
अभिनेत्री राखी या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, हे सर्व आदिलसाठी केलं, पण अडीच तास फ्लाइटमध्ये रडल्यामुळे माझं काजळ पसरलं. काही पापाराझींनी सांगितलं की, तुम्ही आदिलशी एकदा व्हिडिओ कॉलवर बोला, त्यावर राखी म्हणाली की नाही, मी आता बोलणार नाही. कारण काल ​​मी त्याला भेटायला गेले होते, मी त्याच्यासाठी थांबले पण तो तिथे आलाच नाही.


राखीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत
राखी सावंत दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. याआधीही राखीचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये ती बूस्टर डोसला शिव्या देत होती कारण या डोसनंतर तिची तब्येत बिघडू लागली होती. बूस्टर डोसमध्ये शिलाजीत आणि व्हायग्रासारख्या गोष्टी मिसळल्या गेल्याचं तिने म्हटलं होतं. ते घेतल्यानंतर तिला दोन रात्री झोप लागली नाही.