मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी डान्सर-अभिनेत्री राखी सावंत, सगळ्या गोष्टीं वेगळ्या पद्धतीने करण्यामुळे ओळखली जाते. अलीकडेच, तिने आपल्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या ऑटो रिक्षाचालकांसोबत नाचण्यास सुरुवात केली. अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असेत. बिग बॉस 14 पासून राखी एंटरटेनमेंट क्वीन बनली आहे. सोशल मिडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो नेहमी व्हायरल होतात. राखीने बिग बॉस 14मध्ये तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. नुकतच राखीने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, आता तिला आई बनण्याची इच्छा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलेल्या एका मुलाखतीत राखी म्हणाली आहे की, जर तुम्हाला जास्त वेळ काम करायचं असेल तर, तुम्ही एग्ज फ्रीज करणं ही चांगली कल्पना आहे. स्त्रियांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांना गर्भधारणा करण्यात मोठी अडचण येते. एका वयानंतर स्त्रीला आई बनणं अवघड होतं. आपल्याला बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम करायचं असेल आणि भविष्यात आपण मुलांसाठी एग्ज फ्रीज करु शकतात.


आई व्हायचं आहे 
राखी पुढे म्हणाली की, ''आता मी आई व्हायला तयार आहे. हो मला आई व्हायचं आहे. आता वेळ आली आहे. कारण मी एग फ्रीज ठेवली आहेत. नंतर मी देखील काम करू शकते. जर माझा नवरा आला तर ठिक आहे अन्यथा भविष्यात मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.


राखीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतचं राखीचं ड्रीम में एंट्री रिलीज झालं आहे. हे गाणे सुपरहिट ठरलं आहे. गाणे सुपरहिट झाल्यावर राखीनेही जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. राखी सावंत काही काळापूर्वी इंडियन आयडल 12या रिअॅलिटी शोमध्ये गेली होती. तिथे तिने लावणी करून सर्वांची मने जिंकली.