Rakhi Sawant Viral Video : आदिलसोबत विवाहानंतर राखीनं परिधान केला बुरखा...तशीच आली आईच्या भेटीला
Rakhi Sawant चे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत राखीचा लूक पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे,
Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनं (Rakhi Sawant) बॉयफ्रेंड आदिलसोबत (Adil Durrani) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. दरम्यान, राखीनं इस्लाम धर्म देखील स्विकारला आहे. राखीचं नाव बदलून फातिमा करण्यात आले आहे. राखीचं हे रूप पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. आता राखीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राखी बुरखा घालून रुग्णालयात जाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी आणि तिच्या फॅन अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखीनं काळ्या रंगाचा हिजाब आणि ग्रे रंगाचा बुरखा घातलेला असून गाडीतून उतरताना दिसते. त्यानंतर ती रुग्णालयाकडे जाते. त्यानंतर तिच्या मागून येणाऱ्या आदिलला गेटवर असणारे काही लोक अडवतात मग राखी त्याला आत येऊ द्या असे सांगते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
राखीची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत असून क्रिटिकेअर (Criticare) रुग्णालयात उपचार घेत आहे. आईला भेटण्यासाठी राखी रुग्णालयात जात असतानाचा तिचा हा व्हिडिओ आहे. राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावेळी ती रुग्णालयातून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राखीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, आदिलशी लग्नानंतर राखीनं तिचा पेहरावही बदलला आहे.
हेही वाचा : Remo D'Souza ही झाला हास्यजत्रेचा फॅन! 'अवली लवली कोहली' गाण्यावर थिरकत व्हिडीओ केला शेअर
काही दिवसांपासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याची बातमी येत होती. राखीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. राखी प्रेग्नंट असल्याचा अंदाज लोकांनी लावला होता, त्यामुळेच तिने लग्नाची घोषणा केली होती. मात्र, आता राखी सावंतच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मात्र या सगळ्या बातम्यांदरम्यान राखी सावंतच्या नवऱ्याने आदिल खान दुर्रानीने एक पोस्ट शेअर केली आहे आणि राखीची प्रेग्नंसी न्यूज पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राखीच्या गर्भपाताची ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं अभिनेत्रीच्या नवऱ्याने सांगितलं आहे.