Rakhi Sawant Marriage Photos : बॉलिवूड अभिनेत्री, ड्रामा क्वीन कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशीच एक सिनेसृष्टीत तितकीशी कमाल करु न शकणारी राखी सावंत तिच्या विचित्र गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच तिच्या पर्सनल लाइफमुळेही ती अनेकदा चर्चेत असते. राखीने अचानक लग्न करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्यातच आता ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पण या ट्विस्टने राखीला दु:खाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू दिले आहेत. ते म्हणजे राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल खानने त्याचं दुसर लग्न झालं की नाही याबाबतचा सुखद धक्का आदिलने राखीला दिला आहे.  


आदिलने राखी स्वीकारला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये ती रडताना दिसून आली. जेव्हापासून राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हापासून राखी आणि आदिलचे लग्न झाले की नाही यावर सस्पेंस होता. तसेच 'आदिलने हे लग्न सर्वांसमोर न आणण्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मी मागील सात महिन्यांपासून हे लग्न लपवून ठेवलं' असल्याचं ती म्हणाली. लग्नाबाबत सर्वांना समजलं, तर आपल्या बहिणीसाठी मुलगा शोधणं कठीण होईल असं आदिलला वाटत असल्याने त्याने हे लग्न सर्वांसमोर न आणण्याचं म्हटल्याचं राखीने सांगितलं.
 



'मी राखीशी लग्न केलंच नाही...'


मात्र आता आदिलनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये आदिलने म्हटलं की, 'अखेर मी एक मोठी घोषणा करत आहे, मी राखीशी लग्न केलंच नाही असं कधीच म्हटलं नव्हतं. पण मला काही गोष्टी हाताळायच्या होत्या म्हणून मी शांत होतो. पण आता राखी आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. (पप्पुडी)”, असे आदिलने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. राखीनेही या पोस्टवर रिॲक्ट केलं आहे. थँक्यू जान... लव्ह यू, असं तिने म्हटलं आहे.  राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. 29 मे 2022 ला दोघांचा निकाह झाला. 2 जुलै 2022 ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केलं.