मुंबई: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांमधलं लोकप्रिय नाव. अभिनय आणि लेखणी अशा दोन्ही क्षेत्रात सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध आहे. अभिनयासोबत लिखाण क्षेत्र जोडले की, ही सोनाली म्हणजे सिनीअर सोनाली हे न सांगताही आपल्या लक्षात येते. अशा या सिनीअर सोनालीसाठी रक्षाबंधन सर्वच बहिणींप्रमाणे हळवा विषय. मात्र, हा सण साजरा करण्याची तिची खास पद्धत आहे. आपल्या आवडत्या रक्षाबंधन सणाविषयी सोनालीची ही प्रतिक्रीया....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्षाबंधन या सणाबाबत सोनाली काहीशी हळवी होते. हा सण साजरा करण्याबाबत ती बोलताना ती म्हणते, संदीप आणि संदेश या दोन भावांसोबत मी रक्षाबंधन साजरे करते. या दोघांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा नियम मी दरवर्षी पाळतेच. आपल्या भावांविषयी सांगताना ती म्हणते, “माझे भाऊ माझे मेन्टॉर आहेत. माझं पहिलं पुस्तक ‘सो कुल’ मी त्यांना डेडीकेट केलं होतं. आणि आता दूसरं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ते ही मी त्यांना डेडीकेट करणार आहे. ते दोघंही लहानपणापासूनच माझं अवघं विश्व आहेत.”


रक्षाबंधन साजरं करण्याबाबत ती म्हणते, “संदीप परदेशांत राहतो. त्यामूळे त्याची दर रक्षाबंधनाला भेट घडणं शक्य होत नाही. पण मी तिला इ-मेल पाठवायचे. त्यावेळी लिहायचे, की, तू तुझी मुलगी माहीला जेव्हा कडेवर घेशील तेव्हा माझी राखी तुला पोहोचली असे समजेन.”


संदेशसोबत रक्षाबंधन साजरं करण्याच्या आठवणी खूपच मजेशीर असल्याचं ती सांगते, “संदेश आणि मी रक्षाबंधनाला भेटतोच. यंदाही मी पूण्याला एका समाजसेवी उपक्रमात व्यस्त आहे. पण तो उपक्रम आटपून त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं करायला मुंबईत परतणार आहे. मी चित्रपटसृष्टीत व्यस्त असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होतं. कधी माझ्या चित्रपटाच्या सेटवर, तर कधी एअरपोर्टवर, एकवर्षी तर आम्ही दोघं खूप व्यस्त असल्याने कारमध्येच रक्षाबंधन साजर केलं होतं. 


सोनालीचे दोघंही भाऊ खूप सुंदर गिफ्ट्स देतात, असं ती सांगते, “मला पुस्तक वाचायला खूप आवडतात. म्हणून संदेश दरवर्षी मला पुस्तकं देतं. त्याने दिलेली पुस्तक अनेकदा मला जगण्याचा नवा दृष्टीकोण देऊन जातात. मी लेखिकाही असल्याने, संदीप मला खूप सुंदर फाऊंटन पेन, नोटपॅड, फाइल्स अशी काही ना काही लेखनाशी निगडीत गिफ्ट्स देतो.”