RRRच्या रामने हनुमान जयंतीला वानरांना खाऊ घातली बिस्किटं, आता फॅन्स म्हणतायत...
राम चरणने आपल्या खास शैलीत चाहत्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच भावतो आहे.
मुंबई ः साऊथ सुपरस्टार राम चरण सध्या चांगलाच चर्चेत आहे. RRRच्या यशाने राम चरणच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झालीय. साऊथमध्येच नव्हे तर देशभरातूनही प्रेक्षक रामवर प्रेम करू लागले आहेत. RRR सिनेमाच्या यशाने रामला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं आहे. रामचा साधेपणानेही त्याच्या चाहत्यांना खास भावताना दिसत आहे. रामचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.ज्याची त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे.
राम चरणने आपल्या खास शैलीत चाहत्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत राम दाढीला कलर करताना दिसत आहे. त्याचवेळी हनुमानाचा अवतार ज्याला मानतात तो वानर त्याच्या रुममध्ये येतो आणि सोफ्यावर बसतो. यावेळी रामने वानराला आपल्याजवळील बिस्किट खाऊ घातल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. तर व्हिडीओच्या बँकग्राऊंडला हनुमान चालिसाही सुरू आहे. रामच्या या कृतीने त्याच्या चाहत्यांचं मन जिंकलंय.
इन्स्टाग्रामवर रामने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.Reel as well as a ‘Real’ असे कमेंट्स चाहते करत आहेत.
रामचरणचा हा व्हिडीओ रामचे वडील म्हणजेच अभिनेता चिरंजीवीनेही शेअर करत हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यापूर्वीही अनेक व्हिडीओमधून रामचरणने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. RRRमध्ये बॉडीगार्डचं काम करणाऱ्या रस्टी नावाच्या एका व्यक्तीला रामने आर्थिक मदत केली होती. याबाबत खुद्द रस्टीनेच व्हिडीओ शेअर करून याचा खुलासा केला होता.
रामचरण सध्या आपल्या आगामी आचार्य सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात राम वडील चिरंजीवीसोबत दिसणार आहे. त्यामुळे चिरंजीवी आणि रामचरणला सोबत पाहण्याची संधीही त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.