Ram Charan Portable Temple: 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याने ऑस्कर (Oscar) पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याच आठवड्यामध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील या गाण्याने सर्वोत्तम ओरिजन स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या सोहळ्याला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआरसहीत (Jr. NTR) दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. या सोहळ्यासाठी भारतामधून परदेशात जाताना राम चरण अनावणीच होता. राम चरणच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे राम चरण हा फार धार्मिक असून तो मोठ्या श्रद्धेनं देवाची पूजा करतो असं त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. इतकच काय तर राम चरण जिथे जिथे जातो तिथे तो आपल्यासोबत छोटा देव्हारा घेऊन जातो. 


मुलाखतीत दिलेली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यासाठी अमेरिकेतील लॉस एन्जलीसमध्ये जातानाही राम चरण स्वत:बरोबर हा छोटा देव्हारा घेऊन गेला होता. "मी जिकडे जातो तिकडे माझ्या पत्नीच्या मदतीने छोटा देव्हारा घेऊन जातो. मला या माध्यमातून सकारात्मक उर्जा मिळण्याबरोबरच भारताशी कनेक्टेड असल्यासारखं वाटतं," असं राम चरणने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये राम चरण आणि त्याची पत्नी उपासना प्रभू रामचंद्र, सिता माता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पाया पडताना दिसत आहेत. या देव्हाऱ्यामध्ये लक्ष्मी मातेची कमळावर विराजमान झालेली मूर्तीही आहे.


राम चरणचा हा धार्मिक जिव्हाळा पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.


1) नेहमी देव्हारा सोबत ठेवतात



2) जिकडे जातो तिकडे देव्हारा नेतो



3) आम्हाला भारताशी कनेक्टेड ठेवतो देव्हारा



4) पत्नीच्या मदतीने नेतो देव्हारा



5) आम्ही छोटा देव्हारा सोबत नेतो



6) देव्हाऱ्याची गोष्ट



अय्यपा भक्त


राम चरणने आपण अय्यपा देवाची दिक्षा घेतल्याचंही एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. वर्षातून एकदा या देवाच्या उपासनेच्या वेळी राम चरण काळे कपडेट परिधान करतो, चप्पल न घालता फिरतो आणि 40 दिवस केवळ शाकाहारी जेवण करतो. 



ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील राम चरण आणि त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.