Ram Charan's Wife on Motherhood : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण (Ram Charn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या RRR चित्रपटामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना (Upasana Konidela) लवकरच आई-वडील होणार आहेत. लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे. यापुर्वी ते दोघे कुटुंब सुरु करण्यासाठी वेळ काढण्याविषयी बोलले होते. काही काळापूर्वी अध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्याशी झालेल्या एका संभाषणात, उपासनाने लोकांनी तिला मातृत्व स्वीकारण्यास सांगण्याबद्दल सांगितले.


पाहा काय म्हणाली उपासना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या सुरुवातीला मंचावर सद्गुरूंसोबत झालेल्या संभाषणात उपासनानं त्यांना विचारले की लोक 'तिच्या प्रजननक्षमतेवर प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य का मानतात.' तिने मंचावर विचारले की, 'माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि मी त्यात खूप आनंदी आहे. माझे माझ्या आयुष्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, पण लोक माझ्या RRR वर प्रश्न करणे हे त्यांचे कर्तव्य का मानतात. पहिले माझे नाते आहे. दुसरी म्हणजे माझी प्रजनन करण्याची क्षमता आणि तिसरी म्हणजे माझ्या आयुष्यातील भूमिका. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना उत्तर हवे आहे.'



राम चरण आणि उपासना हे दोघं 2012 साली हैद्राबादमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांची भेट ही एका स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2022 हे वर्ष रामसाठी त्याच्या खासगी आणि करिअरमध्ये खूप खास आहे. SS राजामौली दिग्दर्शित RRR या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाल्यापासून जगभरात हिट ठरला आहे. त्याच वेळी, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ते वडील बनणार आहेत.