लेकीच्या जन्मानंतरची राम चरणची पहिली प्रतिक्रिया; असं काही केलं की पत्नीही भावूक...पाहा Video
Ram Charan : राम चरणनं पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राम चरण हा त्यांच्या लग्नाचा 11 वर्षांचा प्रवास सांगत त्यातही त्याची पत्नी आाणि मुलीविषयी सांगितल्या अनेक गोष्टी...
Ram Charan : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. काल 20 जून रोजी त्याची पत्नी उपासना कामिनेनीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्तानं सगळ्यांनीच उपासनाला खूप शुभेच्छा दिल्या. तर राम चरणनं उपासनाला थोड्या हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. राम चरणनं त्यांचा एक अनसिन व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांचा 11 वर्षांचा प्रवास पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राम चरणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उपासना त्यांच्या बाळाविषयी बोलताना दिसते. उपासना म्हणाली की माझी इच्छा आहे की माझं बाळ हे चेंचुसचा एक भाग व्हावे. मला माझ्या बाळावर कोणतंही टॅक नको आहे. मला वाटतं की बाळानं स्वत: सगळं सिद्द करून दाखवावं. हे कोणत्याही प्रकारच्या दबावात केलं जाऊ शकत नाही, यासाठी खूप मेहनत गरजेची आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टींना सांभाळून ठेवायला हवं आणि मला वाटतं की आपण एकमेकांसोबत सगळ्यात जे आनंदीत क्षण असतात त्यांना महत्त्व द्यायला हवे.
राम चरण त्या व्हिडीओत सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलतो की "मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्याची एक वेळ आणि जागा मिळते आणि या बाळाला देखील त्याची योग्य वेळ मिळाली. हे सगळं खूप तणावपूर्ण होतं. सगळं काही नीट होईल पण मला वाटतं की जेव्हा बाळ आईच्या गर्भातून बाहेर येईल तेव्हाच आम्हाला शांत वाटेल आणि हे नऊ महिने खरंच खूप चांगले गेले."
हेही वाचा : प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?
व्हिडीओत राम चरणनं उपासनासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये जातानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यानंतर पुढे व्हिडीओत राम चरण हा त्याच्या मुलीला कुशीत घेऊन बाहेर येत असल्याचे दिसते. तर त्यांचं संपूर्ण कुटुंब किती आनंदी आहे ते पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्यात पुढे त्यांच्या मुलीच्या नामकरणच्या कार्यक्रमातील एक क्लिप देखील दाखवली आहे. हा व्हिडीओ शेअर करत राम म्हणाला, "वााढदिवसाच्या शुभेच्छा उपासना आणि आपल्या काराला एक महिन्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आमचं सगळ्यात चांगलं गिफ्ट आहेस." राम चरणच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'गेम चेंजर' मध्ये दिसणार आहे. तर या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे.