Project K Teaser : दाक्षिणात्य अभिनेता 'प्रोजेक्ट के' ची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं नुकतंच पोस्टर प्रदर्शित झालं. या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला 'आयरन मॅन 3' ची कॉपी असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अनेकांनी त्याला भारताचा 'आयरन मॅन' असे म्हटले होते. आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचं ऑफिशियल अनाइंसमेंट करत त्याचं नाव देखील सांगितलं आहे. अमेरिकेत झालेल्या सेन डिएगो कॉमिक कॉन इव्हेंटमध्ये या चित्रपटाच्या टायटलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता या चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नाही तर 'कल्कि 2898 एडी' असं असल्याचे समोर आलं आहे. याशिवाय चित्रपटाच्या टीझरमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं नाव 'प्रोजेक्ट के' नसून 'कल्कि 2898 एडी' असं ठेवण्यात आलं आहे. काल म्हणजेच 20 जुलै रोजी अमेरिकेत तर भारतात आज म्हणजेच 21 जुलै रोजी टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा 1.15 मिनिटांचा हा टीझर आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे की दिग्दर्शक नाग अश्विन यांनी चित्रपटात विष्णु देवाचा मॉर्डन अवतार दाखवला आहे. या टीझरमध्ये नरसंहाराची कहाणी दिसते. जगात सर्वत्र अंधार असून अंधक्कारचे राज्य आहे. तर यात लोकांना कैद केल्याचे दिसत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोकांना उपाशी ठेवले जात आहे. त्या सगळ्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. तर दुसरीकडे एका मोठ्या खोलीत शिवलिंगही आहे, पण तिथे कोणत्याही प्रकारची पूजा नाही. तर, कोणाच्या हातात हनुमानजींची छोटी मूर्तीही दिसते. लोकांना परमेश्वराची आठवण होताच प्रभास त्यांचा संरक्षक म्हणून भूमिवर कसा येतो ते पाहायला मिळते. अशातच एक व्यक्ती विचारते की प्रोजेक्ट के काय आहे? याचं उत्तर आता नाही तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.
हेही वाचा : Vivek Oberoi ला 1.55 कोटींचा गंडा, बिझनेस पार्टनरनच केला घात; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होईन फक्त 10 तास झाले असून त्याला इतक्या वेळात 3.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निर्मात्यांनी सगळ्यात आधी दीपिकाचा लूक दाखवला होता. पण तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता मात्र, दीपिकाची नक्की भूमिका काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, ज्या प्रकारे असं म्हटलं जातं की कलयुगात जेव्हा अत्याचार, क्राईम आणि नकारात्मक भावना खूप वाढेल तेव्हा विष्णू भगवान हे कल्किच्या रुपात धरतीवर येतील आणि सगळ्यांना मदत करतील. हेच यात दाखवण्यात आलं आहे.