मुंबई : 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉक्स ऑफीसवर तमन्नाचा 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. एवढचं नाही तर तिच्या अभिनयाचं देखील सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्या अभिनयाने प्रभावित होवून चिरंजीवी यांनी सून उपासना कोनीडेलाने तिला जगातील सर्वात महागडा हिरा भेट म्हणून दिला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हिऱ्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या हिऱ्याची किंमत चक्क दोन कोटी रूपये आहे. तमन्नाला भेट स्वरूपात मिळालेला हा हिरा जगातील ५ नंबरचा सर्वात मोठा हिरा आहे. खुद्द उपासना कोनीडेलाने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. 


परंतु उपासना आणि तमन्नाने या हिऱ्याची किंमत सांगितली नाही. 'से रा नरसिंहा रेड्डी' तमन्ना 'लक्ष्मी'ची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटात अभिनेते अमिताभ  बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.