Ram Gopal Varma: राम गोपाल वर्माची अनेकदा चर्चा होताना दिसते. तो त्याच्या वक्तव्यांवरून आणि वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असतो. सध्या अशाच एका वादग्रस्त विधानावरून राम गोपाल वर्माचे खडके उडालेले पाहायला मिळत आहेत. अनेकदा राम गोपाल वर्मावर स्त्रियांची गैरवर्तन केल्याचेही आरोप आहेत त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. आता अशाच एका वक्तव्यावरून पुरती खळबळ माजली आहे. त्यामुळे राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी त्यांनी असं कोणतं वक्तव्य केलं आहे ज्याची इतकी चर्चा रंगली आहे पाहुयात... अनेकदा बॉलिवूडमध्ये अशाच वक्तव्यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केले जाते. यावेळी राम गोपाल वर्मांच्या या वक्तव्यावरूनही नानाविध चर्चांना उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आम्ही तुम्हाला एक प्रसंग सांगतोय कदाचित हा प्रसंग तुम्हाला आठवतं असेलच की, निर्माते शेखर कपूर यांची पहिली पत्नी सुचित्रा कृष्णमुर्ती आणि राम गोपाल वर्मा यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातून डिरेक्टर राम गोपाल वर्मासोबत तिला लग्नही करायचे होते. त्यावेळी यावर राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया ही आश्चर्यकारक होती. त्यातून तिच्या या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले नव्हते आणि सोबतच तिच्या या प्रतिक्रियेवर राम गोपाल वर्मा हे प्रचंड घाबरले होते. त्यानंतर तिला राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले होते आणि मग त्यावेळी जी गोष्ट घडली होती त्याचा आता धक्कादायक खुलासा झाला आहे. आता पुन्हा एकदा ही दोघं चर्चेत आली आहेत. 


हेही वाचा - सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मागील 12 वर्षांपासून नंबर 1 वर आहे 'हा' अभिनेता


सध्या सुचित्रा यांचे आत्मचरित्र चर्चेत आले आहे. यामध्ये तिनं या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. ज्यात तिनं राम गोपाल वर्मा यांना एक मेसेज पाठवल्याचे ती कबूल करते. यात तिनं राम गोपाल वर्मा यांना तू माझ्याशी लग्न करशी का? असा प्रश्न विचारत हा मेसेज केला होता. राम गोपाल वर्मा यांनी सुचित्रासोबत 'रण' आणि 'माय वाईफ्स मर्डर' या चित्रपटांतून एकत्र कामं केली होती. त्या दरम्यानची ही घटना असून यावेळीच तिनं राम गोपाल वर्माला लग्नाची मागणी घातली होती. 


पण राम गोपाल वर्मा यांनी तिची मागणी पुर्ण केली नाही तर याऊलट त्यांनी या लग्नाला नकार दिला होता. आणि त्यावर ते म्हणाले होते की, ''मी महिलांचा वापर फक्त इंटिमेसीसाठी करतो. मला महिलांचं शरीर आवडते. मला महिलांना फक्त पाहायला आवडतं. त्यांना ऐकायला नाही. म्हणून तू माझ्यापासून शक्य तितकं दूर राहा'' 'बॉलीवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत सध्या सुचित्रानं मुलाखती दिली आहे, ज्यात तिनं याविषयी खुलासा केला आहे.  


ती म्हणाली की तिनं ही मस्करी केली होती परंतु राम गोपाल वर्मानं ते गांभिर्यानं घेतलं होतं. ती म्हणाली की त्यांच्याशी लग्न कोण करणार मी तर त्यांची मस्करी केली होती परंतु माझ्या मेसेजनं ते घाबरले. त्यानंतर सुचित्रा ही मस्करी करत असल्याचे त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचल्यावर सांगितले. माझ्याशी लग्न करू नकोस म्हणून ते त्यांना समजावत होते.