World Richest Actor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची. हे अभिनेते जगातील सर्वातील महागडे अभिनेते आहेत. परंतु इतकेच नाहीत तर यांच्याहून अघिक मानधन घेणारा एक अभिनेता आहे ज्याची सॅलरी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवया राहणार नाही कारण या अभिनेत्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण असा प्रश्न विचारला तर कदाचित कोणत्यातरी हॉलिवूडच्या कलाकाराचे तुमच्या डोळ्यासमोर येत असेल परंतु असे नाही तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवूडच्याच गोट्यातला आहे. हो, हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि त्याच्या चित्रपटांचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
मध्यंतरी जगातला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून शाहरूख खानची फारच चर्चा होती. परंतु शाहरूख खानलाही मागे टाकत या अभिनेत्यानं जगातील सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान पत्करला आहे. तेव्हा त्याचे मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवया राहणार नाही कारण सध्या त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्याचे नावं आहे टेलर पेरी. रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याची नेटवर्थ ही 8200 कोटी रूपये इतकी आहे. फॉर्ब्सनुसार पाहिलेत तर या अभिनेत्याची नेटवर्थ ही 2023 नुसार, 100 कोटी USD एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्याचा मान त्यानं पटकावला आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याविषयी थोडंसं.
हेही वाचा - 'माहेरची साडी' चित्रपटासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं माहिती आहे का?
DNA च्या रिपोर्टनुसार, फॉर्ब्स 2011 च्या लिस्टमध्ये सर्वाधिक कमाई केलेला अभिनेता हे टेलर पेरी होता. त्यानंतर आताही या अभिनेत्याचा आकाडा कायमच चढता दाखवतो आहे. अशातच आता चर्चा आहे की त्यानं ही कमाई कशी केली आणि तो पहिला व जगातिक सर्वाधिक श्रीमंत अभिनेता कसा ठरला?
टेलर पेरी हा फक्त अभिनेताच नाही तर तो एक फिल्ममेकर, लेखक, बिझनेसमन, प्रड्यूसरही आहे. ज्यातून तो कोट्यवधी रूपये कमावतो. मिंटच्या रिपोर्टनुसार, टेलर पेरीनं एका कॉमेडी शोमधून चक्क 138 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ज्याचा अर्थ हे पैसे म्हणजे जवळपास 1140 कोटी रूपये इतके होते. फॉर्ब्सच्या रिपोर्टनुसार, टेलर पेरी यांच्या नावावर 22 चित्रपट, स्टेज प्लेची, 1200 टेलिव्हिजन एपिसोड असा रेकॉर्ड आहे. यावेळी त्यानं या सगळ्याचे कॉन्टेंट एकत्ररीत्या केलं आहे.