`मला आई आवडायची, मुलगी नाही`; राम गोपाल वर्माने केलं उघड, म्हणाला `मी कधीही जान्हवीसोबत...`
Ram Gopal Varma On Sridevi and Janhvi Kapoor : राम गोपाल वर्मानं श्रीदेवी आणि जान्हवी कपूरविषयी केलं वक्तव्य, `आई आवडायची, मुलगी नाही` असं म्हणतं म्हणाला...
Ram Gopal Varma On Sridevi and Janhvi Kapoor : लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हा नेहमीच त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. राम गोपाल वर्मा नेहमीच श्रीदेवी यांची स्तुती करतो. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीदेवी यांच्याविषयी राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांच्या चॅनलमध्ये नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपट दिग्दर्शकानं पुन्हा एकदा श्रीदेवी विषयी चर्चा केली पण यावेळी त्यानं श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. राम गोपाल वर्मानं स्पष्ट केलं की त्याला जान्हवीसोबत काम करायचं नाही. राम गोपार वर्मा यांनी यावेळी सांगितलं की 'मला आतापर्यंत जान्हवीमध्ये श्रीदेवी दिसल्या नाहीत.'
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जान्हवीनं 'देवरा' या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेमृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर केली. या चित्रपटासाठी करत असलेल्या एका फोटोशूट दरम्यान, एक अशी वेळ आली जेव्हा जान्हवी ही तिची आई श्रीदेवी यांच्यासारखी दिसत होती असं ज्युनियर एनटीआरनं सांगितलं. तर ही 'तुलना चुकीची आहे आणि स्वत: ला 'श्रीदेवी हॅन्गओवर' असल्याचं राम गोपाल वर्मा म्हणला. त्यांन म्हटलं की 'तिचा परफॉर्मन्स पाहून मी विसरलो की मी एक चित्रपट निर्माता आहे हे मी विसरलो होतो आणि एक प्रेक्षक म्हणून पाहणं मी सुरु केलं.'
जान्हवी कपूरसोबत काम करण्याविषयी विचारण्यात आल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाला, 'मला आई आवडायची, मुलगी नाही. माझं कोणतं कनेक्शन नाही, तर हो माझं जान्हवीसोबत काम करण्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नाही.'
हेही वाचा : विमानतळावर स्टाफवर खेकसल्या जया बच्चन; VIDEO पाहताच नेटकरी संतप्त
दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर राम गोपाल वर्मा एका नव्या प्रोजेक्टसोबत कमबॅक करण्यासाठी तयारी करत आहे. त्यात मनोज बाजपेयी असणार आहेत. जान्हवी विषयी बोलायचं झालं तर ती लवकरत 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'परम सुंदरी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, जान्हवी कपूरचे लाखो चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. तर 'देवरा' या चित्रपटानंतर दाक्षिणेत देखील तिचे चाहते वाढले.