मुंबई : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री नयना गांगुली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा हेडलाईनमध्ये असते. नयना गांगुलीबद्दल बोलताना, तिला प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पहिला ब्रेक दिला होता. राम गोपाल वर्मा यांची दिग्दर्शकांच्या यादीत गणना होते जे चित्रपटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देतात. नैनाने वर्ष 2016 मध्ये तेलगु चित्रपट 'वांगवेती' द्वारे पदार्पण केलं, या चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा ब्रेक दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 मध्ये नैना ने 'मेरी बेटी सनी लियोन बन्ना चाहती है' या लघुपटानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने एका मुलीची भूमिका साकारली होती. जी सनी लिओनीपासून प्रेरित आहे आणि तिच्यासारखी बनू इच्छित आहे. नैनाने अलीकडेच एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे, जे तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 



तिचे हे फोटो राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दिग्दर्शकानं लिहिलंय की, 'सुंदरता की सुंदरता इसे कैप्चर करना है..'' नयना गांगुली फक्त 27 वर्षांची आहे. २०२० साली 'जोहर' या तेलगू चित्रपटात ती शेवटची दिसली होती. चित्रपटात तिने 'बाला' नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती, ज्या भूमिकेचं तिचं खूप कौतुक झाल होतं.