Arun Govil as Lord Vitthala: सध्या पौराणिक कथा आणि ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर भारताबाहेरील प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी आहे. यावर्षी आदिपुरूष हा चित्रपच प्रदर्शित झाला होता. 16 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता परंतु या चित्रपटांनं हवी तशी बॉक्स ऑफिसवर ना कमाई केली ना हा चित्रपट प्रेक्षकांना रूचला. रामायणासारख्या पवित्र आणि महान महाकाव्याचे असे विद्रुपीकरण केल्यानं समाजात याबद्दल मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला होता. 600-700 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. त्यामुळे एडव्हान्स बुकींगच्या साहाय्यानं का होईना हा चित्रपट 300 कोटींच्या घरात पोहचला खरा परंतु त्याहून जास्त घौडदोड हा चित्रपट करू शकला नाही. त्यातून थोड्या फार प्रमाणात नकारात्मक प्रसिद्धीचाही या चित्रपटाला फायदा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर प्रेक्षकांमधून नेगेटिव्ह कमेंट्स येयाला फार वेळ लागलाही नव्हता. सोशल मीडियावर प्रेक्षक अक्षरक्ष: या चित्रपटाच्या विरोधात गेले होते. 1980 च्या दशकात आलेल्या पाहिल्यवहिल्या छोट्या पडद्यावरील 'रामायणा'च्या रामानं म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अरूण गोविल यांनीही नाराजी दर्शवली होती. त्यांच्यासोबत लक्ष्मणाची भुमिका करणारे सुनील लहरी यांनीही या चित्रपटाविरोधात कडक भुमिका घेतली होती. आता अरूण गोविल कुठल्याही चित्रपटातून किंवा मालिकेतून काम करत नाहीत. परंतु सध्या ते पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पुर्नरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते आहे.


त्याचसोबत ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. परंतु सध्या समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरूण गोविल हे लवकरच संत तुकारामाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत आणि यावेळी विठ्ठलाची भुमिका ते करणार असून संत तुकाराम यांची भुमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे. 


हेही वाचा - कसलं नाविन्य? कोट्यवधी डॉलर्सची कमाई केलेले 'हे' हॉलिवूडपट पौराणिक कथांवरून चोरलेले!  


बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, ''मुख्य म्हणजे ही भुमिका फार खास आहे. मीच ही भुमिका साकारावी अशी या चित्रपटांच्या दिग्दर्शकांची इच्छा होती. अनेक लोकं आजही मला भक्तीपर चित्रपटात भूमिका करण्यासाठी चिक्कार ऑफर येतात. पण मी मात्र त्या करायला कधीच तयार होत नाही. पण ही भुमिका काही मी नाकारू शकत नव्हतो. तेही संत तुकारामांच्या भक्तीमुळेच. संत तुकाराम हे महाराष्ट्रातले पूजनीय संत आहेत. त्यांनी स्वत:ला विठ्ठलाच्या भक्तीत समर्पित केले होते. त्यातून ते समाजसुधारकही होते. त्यातून या चित्रपटाद्वारे मला विठ्ठलाची भुमिका साकारायला मिळाली. मी यात देवासारखा दिसत नाही. मी एक भुमिका करतो आहे. संत तुकारामांच्या जीवनात दिसणारा मी एक सामान्य माणूस आहे.'', असं ते यावेळी म्हणाले.