Ramayan Mukesh Rawal Death Story: 'रामायण' (Ramayan Hindi Serial) या मालिकेनं 80 च्या दशकात फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली होती. आजहीही ही मालिका प्रत्येक घराघरात पाहिली जाते. या मालिकेनं इतकी लोकप्रियता मिळवली (Ramayan Serial) होती की त्या काळी प्रत्येक घरात रामायण ही मालिका पाहिली जायचीच जायची. संध्याकाळी ही मालिकी लागायची तेव्हा अक्षरक्ष: रस्ते ओस पडायचे असे उद्गार तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून (Ramayan Vibhishan Controversy) ऐकले असतीलतच. या मालिकेतील हरएक पात्र हे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. यामध्ये राम आणि सीता यांच्या भुमिकांपासून प्रत्येकाच्या व्यक्तिरेखा या लक्षात राहण्यासारख्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील विभिषणाची भुमिका साकारणाऱ्या मुकेश रावल (Mukesh Rawal) यांच्याही अभिनयाचे सगळ्यांकडून कौतुक झाले परंतु त्यांचे आयुष्य फार सोप्पे नव्हते. आजपर्यंत अशा अनेक कलाकारांच्या हृदयद्रावक कहाण्या समोर येत असतात. त्यातील एक हृदयद्रावक कहाणी आहे ती म्हणजे अभिनेते मुकेश रावल (Mukesh Rawal Death) यांची. 2016 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्याच्या आयुष्याचा शेवट सोप्पा नव्हता. 


असा मिळाला विभिषणाचा रोल -


तेव्हा ते एक थिएटर एक्टर होते. त्यांच्या एका नाटकाच्या वेळी त्यांच्या अभिनयाला रामनंद सागर (Ramanand Sagar) यांनी पाहिले आणि त्यांची विभिषण या पात्रासाठी ऑडिशन घेतली. तेव्हा ते या ऑडिशनमध्ये पास झाले आणि त्यांना विभिषणाचा रोल मिळाला. 


हिंदी - गुजराती इंडस्ट्रीत काम - 


मुकेश यांना या मालिकेमुळे घराघरात लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी आपल्या करिअरची पहिली सुरूवात गुजराती आणि हिंदी मालिका-चित्रपटामधून (Hindi Movies) केली होती. त्यावेळी त्यांनी 'वह जिद्द', 'लहू को दो रंग', 'औजार और कसक' इत्यादी हिंदी चित्रपटांमधून कामं केली होती. 'हसरतें', 'बींद बनूंगा घोडी चढूंगा' (Most Popular Hindi Serials) अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमधूनही कामं केली आहेत. 


असं काय झालं मुकेश रावल यांच्यासोबत? 


मिडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश यांना नैराश्यानं(Mukesh Rawal Depression) ग्रासले होते. त्यांनी रेल्वे रूळाखाली येऊन आत्महत्या केली होती. 2016 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी आपल्या मुलीच्या लग्नानंतर त्यांना नैराग्यानं जास्त ग्रासले अशी माहिती कळते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक गोष्टी समोर येतात. अनेकदा बॉलिवूड आणि नैराश्य यांचा संबंध या हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळाला आहे.