Adipurush Sunil Lahiri: 'आदिपुरूष' या चित्रपटाचा ट्रेलर (Adipurush Trailer) काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुकवरून वादंगही माजला होता. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटातील विविध दृश्यांवर नाराजीही होता. आता 'आदिपुरूष'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आता ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्याचसोबत अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून नाराजीही व्यक्त केली आहे तर काहींनी खिल्लीही उडवली आहे. यावेळी रामायण या लोकप्रिय मालिकेतील लक्ष्मणाची भुमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri Ramayan) यांनी मात्र या ट्रेलरमधल्या एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. (ramayan actor sunil lahri angry on adipurush trailer what he says read in detail)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुर्वीही रामायण मालिकेतील राम ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अरूण गेविल यांनीही या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुकवरून कडाडून टीका केली होती व त्याचा व्हिडीही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून प्रदर्शित केला होता. 'आदिपुरूष' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि एका दिवसात या ट्रेलरला 52 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट हिंदीसह चार प्रादेशिक भाषांमधूनही प्रदर्शित होणार आहे. काल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला दिग्दर्शक ओम राऊतसह अभिनेत्री क्रिती सनन, अभिनेता प्रभास, देवदत्त नागे आणि या चित्रपटातील सर्वच टीम उपस्थित होती. 


काय म्हणाले सुनील लहरी? 


अभिनेते सुनील लहरी यांनी आज तक डॉट कॉम ला दिलेल्या मुलाखतीत आपली या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी असणारी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''हनुमान हे प्रभु रामाच्या पाठीवर बसले आहेत, आणि त्यावेळी प्रभु राम हे धनुष्यबाण चालवत आहेत. मी आजपर्यंत जेवढं रामायण आणि महाभारत वाचलं आहे त्यात तरी मी कुठेच असं वाचलं नाही की पाहिलं नाही. लक्ष्मण यांनी हनुमान यांच्या पाठीवर बसून धनुष्यबाण चालवला होता. हनुमान यांच्या आग्रहाखातर राम व लक्ष्मण त्यांच्या पाठीवर बसायचे परंतु राम यांना कधी मी हनुमानाच्या पाठीवर बसताना पाहिलेले नाही.''


त्यांनी याच मुद्द्यावर पुढे सांगितले की, ''राम हे हनुमानाच्या खांद्यावर बसले आहेत परंतु त्यांनी मी कधी उडताना पाहले नाहीये. जर असे उडताना दिसले असते तर भगवान इंद्र यांनी प्रभु राम यांच्यासाठी रथ नाही का पाठवला असता? तेव्हा राम हनुमान यांच्या पाठीवर बसून सरळ लंकेत पोहचतात.''


हेही वाचा - 'तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही....?' ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल कोणावर संतापले


टेक्नोलॉजी आणि आदिपुरूष, गणित बिघडतंय का?


सुनील लहरी म्हणाले की, ''रामायणासोबत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत तेव्हा त्याची छेडछोड होता कामा नये. त्यासोबत त्यांनी सांगितले की, व्हिएफएक्सच्या तंत्रामुळेही जो रामायणातला गाभा आहे तो मोडू देऊ नका. व्हिएफएक्स, पौराणिक कथा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सरळमिरळ करणं काही गैर नाही परंतु त्यामुळे या महाकाव्याचा आत्मा बिघडता कामा नये.''


हेही वाचा - '...एक दो और करो', सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया


कपड्यांच्या दृष्टिकोनातूनही आदिपुरूष फेल? 


चित्रपटात राम, लक्ष्मण आणि सीताची भुमिकांच्या वेशभुषेवरूनही सुनील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ''रामायणातील वनवासाच्या वेळी एक भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तर राम, लक्ष्मण हे पुर्णपणे कपड्यानं झाकलेले दाखवले आहेत.''