`रामायण` मधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मालिकेतील सीतेला ही अश्रू अनावर
हा विशेष शो लॉकडाऊन दरम्यान प्रसारित झाला होता.
मुंबई : टीव्हीच्या जगातील सर्वात मोठा शो म्हणजे 'रामायण', जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात पाहिला गेला आहे आणि हा विशेष शो लॉकडाऊन दरम्यान प्रसारित झाला होता, ज्याचा टीआरपी सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. अशा परिस्थितीत आता या शोशी संबंधित एक दुःखद बातमी समोर येत आहे. वास्तविक, 'रामायण'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे.
चंद्रकांत पंड्या यांच्या मृत्यूची पुष्टी रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी केली आहे. दीपिका चिखलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये चंद्रकांत पंड्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
चंद्रकांत यांचे फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले- 'तुमच्या आत्म्याला शांती लाभो चंद्रकांत पंड्या, रामायणातील निशान राज'. त्याचबरोबर रामायणात रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही चंद्रकांत पंड्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मालिकेत चंद्रकांत यांनी साकारलेली निषादराज ही भूमिका कायम लोकांच्या लक्षात राहणार आहे.
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिल्डी गावात राहणारे चंद्रकांत पंड्या यांचा जन्म 1 जानेवारी 1946 रोजी एका व्यापारी कुटुंबात झाला. अहवालानुसार, 'रामायण' व्यतिरिक्त, चंद्रकांत पंड्या यांनी 100 हून अधिक हिंदी-गुजराती चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. रामायणात रावणाची महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदीच्या मृत्यूनंतर लगेचच दुसऱ्या पात्राच्या मृत्यूची बातमी समोर आली.