मुंबई : 'रामायण'मध्ये काम करुन जवळपास ३० वर्ष झाली तरी 'रामा'ची भूमिका करणारा अभिनेता अरुण गोविल अजुनही 'रामा'च्या भूमिकेतून बाहेर पडलेला नाही. त्याने खूप प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. 


१० वर्षे सिनेमांपासून दूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रामा'ची भूमिका केल्यानंतर अरुण गोविलला अनेक भूमिका मिळाल्या. त्यामुळे अरुण जवळपास १० वर्षे सिनेमांपासून दूर राहिला. त्यानंतर 'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका करणारा सुनील लाहिडीसोबत त्यांने आपली प्रोडक्शन कंपनी सुरु केली.


मुंबईत व्यवसाय करु लागला


अरुण गोविल याने 'रामायण'मध्ये 'रामा'ची भूमिका केली. त्यानंतर त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. अरुण हिंदी आणि टीव्ही मालिकांत काम करणारा अभिनेता अशी ओळख झाली. अरुणचा जन्म १२ जानेवारी १९५८ रोजी उत्तर प्रदेश मेरठ येथे झाला. त्याने प्राथमिक शिक्षण उत्तर प्रदेशमध्ये घेतले. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, अरुणने नोकरी करावी मात्र, अरुणचे मन नोकरीत रमत नव्हते, त्यामुळे तो मुंबईत व्यवसाय करु लागला.



अरुणने १७ वर्षी मुंबईत पाऊल ठेवले. त्याने आपल्या व्यवसाय सुरु केला. व्यवसायाबरोबर त्यांने अभिनय सुरु ठेवला. त्यानंतर त्याला ऑफर येऊ लागल्या. १९७७ मध्ये तारा बडजात्याच्या 'पहेली' या सिनेमात त्याला संधी मिळाली.


सिनेमात भूमिका 


अरुणने  `सावन को आने दो`, `सांच को आंच नहीं`, `इतनी सी बात`, `हिम्मतवाला`, `दिलवाला`, `हथकड़ी`, और `लव-कुश`  आदी सिनेमात काम केले आहे. त्यानंतर त्याला 'रामा'ची भूमिका करण्यासाठी ऑफर आली. त्याने ही भूमिका चांगली निभावली आणि त्याचे नाव अधिक प्रसिद्ध झाले. लोक त्याला 'राम' नावानेच ओळखू लागले. त्याआधी त्याने 'विक्रम आणि वेताळ' या मालिकेत विक्रमादित्यची भूमिका साकारली. त्याला दुसऱ्या भूमिकेत लोक पाहू शकत नव्हते. त्यामुळे अन्य भूमिका केल्या नसल्याचे अरुण नमूद करतो.