मुंबई : ज्येष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होती. ३० जानेवारी रोजीच त्यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचा उत्साह हा तरूणांना लाजवेल असा होता. (Ramesh Deo Last Dance Video) आपण शंभरी गाठणार आणि शंभरावा वाढदिवस उत्साहात साजरा करणार अशी त्यांची इच्छा होती. पण ती अपूर्णच राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रमेश देव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तो व्हिडीओ त्यांच्या नव्वदीतील असेल असं म्हटलं जात आहे. रमेश देव 'सूर तेच छेडीता' या लाईव्ह गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. २०१९ पर्यंत ते सतत कामात असायचे. 



मुंबईतील 'सिनेमातील देव' या गाण्याच्या कार्यक्रमात  'सूर तेच छेडीता' या गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी सीमा देवही त्यांच्यासोबत होत्या. हा डान्स परफॉर्मन्स म्हणजे देव साहेब यांच्या चाहत्यांसाठी खास पर्वणीच. आज रमेश देव आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी कायमच सोबत राहतील. 


९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ख्यातनाम सिने अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव यांच्या जाण्यानं सिने क्षेत्रात शोककळा पसरलीय. आज दुपारी अडीच वाजता विलेपार्लेच्या पारसी वाडा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


रमेश देव यांनी हिंदीसह अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. 285 हिंदी सिनेमा, 190 मराठी सिनेमा, 30 नाटक आणि जाहिरांतीमध्ये रमेश देव यांनी काम केलं आहे.