सुपरस्टार अभिनेते, कोट्यवधींचा खर्च, जोरदार प्रमोशन... पण `या` चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकलेच नाहीत
`राम सेतू` सह अक्षयने आपल्या चित्रपटाचे दुसरे ओपनिंग कलेक्शन चांगले केले होते परंतु तीन दिवसांत अक्षयच्या मोठ्या चित्रपटांकडून अपेक्षित कमाई केली गेली नाही. चौथ्या दिवशी मात्र या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अत्यंत वाईट झालं आहे.
Ramsetu and Thank God Box Office Collection: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडच्या मंडळींनी आपले चित्रपट प्रमोट आणि रिलिज करण्याचा योग्य कालावधी निवडला तरी मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी भरारी मारलेली नाही. त्यामुळे फ्लॉप ठरलेले चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घटांगळ्या खात आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट 'राम सेतू' आणि अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'थँक गॉड' चित्रपटगृहांमध्ये एकत्र प्रदर्शित झाले. अक्षयच्या चित्रपटात पौराणिक पुलाचा उल्लेख आहे, ज्याचा भगवान श्री रामाच्या कथेशी खोल संबंध आहे. 'राम सेतू'चा ट्रेलर लोकांना खूप आवडला आणि लोक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. दुसरीकडे अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' हा कॉमेडी चित्रपट होता. हे दोन्ही चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असून पहिल्या दिवसाच्या कमाईवरून अक्षयच्या चित्रपटाला अधिक पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (ramsetu and thank god movie gets flop in diwali eve box office collection akshay kumar ajay devgan)
'राम सेतू' सह अक्षयने आपल्या चित्रपटाचे दुसरे ओपनिंग कलेक्शन चांगले केले होते परंतु तीन दिवसांत अक्षयच्या मोठ्या चित्रपटांकडून अपेक्षित कमाई केली गेली नाही. चौथ्या दिवशी मात्र या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अत्यंत वाईट झालं आहे.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
काय आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन? (Box Office Collection) शुक्रवारच्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट्सनुसार चौथ्या दिवशी अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ने बॉक्स ऑफिसवर सुमारे 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 15.25 कोटींची ओपनिंग केली आहे. त्यानुसार चौथ्या दिवशी चित्रपटाची कमाई ओपनिंग कलेक्शनच्या जवळपास निम्मी आहे. पहिल्या 3 दिवसात 35.40 कोटींची कमाई करणाऱ्या 'राम सेतू'चे कलेक्शन चौथ्या दिवशी 42.40 कोटींवर पोहोचले आहे.
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'थँक गॉड'ला पहिल्या दिवशी 8.1 कोटींची ओपनिंग मिळाली. पहिल्या 3 दिवसात 'थँक गॉड' फक्त 18.25 कोटी रुपयांची कमाई करू शकला. शुक्रवारी चित्रपटाने 3.30 कोटी रुपये कमवले आणि आता या चित्रपटाची एकूण कमाई केवळ दिवसभरात 21.55 कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
या दोन्ही चित्रपटांचे दमदार प्रेमोशन झाले. त्यातून अक्षय कुमार आणि अजय देवगणनंही या चित्रपटांसाठी बक्कळ रक्कम मोजली आहे. या अटीतटीच्या सामन्यात अक्षयच्या रामसेतू आणि अजयच्या थॅक गॉड या चित्रपटांची मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.